Uncategorized
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल सावंत यांचा गावभेट दौरा…..
खा. धैर्यशील मोहिते पाटील ऐकणार अडचणी

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर –पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचार्थ आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील व अनिल सावंत यांचा गावभेट दौरा असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयातून दिली आहे.
आज आंधळगाव येथे सकाळी 10 वाजता, भोसे गावात सकाळी 11.30 वाजता, लवंगी येथे दुपारी 1 वाजता, सलगर येथे सायंकाळी 5 वाजता, मरवडे गावात सायंकाळी 6 वाजता तर मंगळवेढा शहरात सायंकाळी 7 वाजता गावभेट दौरा संपन्न होणार आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील व उमेदवार अनिल सावंत तसेच महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अनिल सावंत यांनी उमेदवारी मिळाल्यापासून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे जाहीर केले आहे.
ग्रामीण भागातील जनता शरद पवार यांच्या विचारांची असल्याने आमदार झाल्यानंतर मतदारसंघांमधील एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही असे आश्वासन देखील अनिल सावंत यांनी दिले आहे.
आज होणाऱ्या गावभेट दौऱ्यामध्ये सर्व नागरिकांना आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे.
