Uncategorized

स्वेरी डिप्लोमाच्या पाच विद्यार्थीनींची ‘फिलिप्स’ कंपनीत निवड

वार्षिक परीक्षेच्या निकालाबरोबरच स्वेरी डिप्लोमाची प्लेसमेंटमध्ये देखील आघाडी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूरः आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व इलेक्ट्रॉनिक्स मधील नावाजलेल्या ‘फिलिप्स’ कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थीनींची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असल्याची माहिती डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ यांनी दिली.
‘फिलिप्स’ कंपनीच्या निवड समितीने येथील डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या अमृता ब्रम्हदेव रणदिवे, गायत्री रामचंद्र गोरे, आयेशा नवाज मुलाणी, ऐश्वर्या बाळासाहेब चव्हाण व श्रुती श्रीकांत वागज या पाच विद्यार्थिनींची निवड केली असून यांना वार्षिक दोन लाख सोळा हजार रु. इतके पॅकेज मिळाले आहे. पदवी अभियांत्रिकीला मिळत असलेल्या अफाट यशाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालय देखील सुरू करावे अशी मागणी केल्यामुळे २००८ साली स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या कुशल आणि नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली स्वेरी अंतर्गत डिप्लोमा अभियांत्रिकीची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून निकाल, प्रवेश संख्या ही आघाडीवर असतानाच आता प्लेसमेंट मध्ये देखील या महाविद्यालयाने मोठी झेप घेतल्याचे दिसून येत आहे. स्वेरीत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली असल्याचे दिसून येते. स्वेरीमध्ये शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच या विद्यार्थिनींना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. ए. सी. वसेकर, विभागप्रमुख प्रा. पांडुरंग वलटे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त,कॅम्पस इनचार्ज, डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close