श्री विठ्ठल कारखान्यावर शेती स्टॉफ प्रशिक्षण शिबीर संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
वेणुनगर, दि.०२ वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक ०२.०४.२०२५ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेमध्ये आयोजित केला होता. या प्रसंगी प्रथम श्री विठ्ठलाचे प्रतिमेचे पुजन नेटाफिम कंपनीचे कृषी विद्या प्रमुख श्री अरुण देशमुख, सेल्स मॅनेजर श्री मल्लीनाथ जट्टे, श्री सतीश माने, श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बालाजी घाडगे, प्रा.श्री ज्ञानसागर सुतार यांच्या शुभहस्ते संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
स्वागत व प्रस्ताविकात बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री आर.बी. पाटील म्हणाले की, ऊस विकास योजनांची माहिती शेतकऱ्यांना सांगुन ऊसाचे एकरी उत्पादन वाढविणे व साखर उतारा वाढवून कारखान्यास चांगला ऊस पुरवठा करावा, असे आवहान केले.
सदर प्रसंगी बोलताना नेटाफिम कंपनीचे कृषी विद्या प्रमुख श्री अरुण देशमुख म्हणाले की, एकरी १०० टन ऊस उत्पादन घेणे करीता पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन या पिकासाठी महत्वाचे आहे. शेतकरी हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कमी करुन ऊस पिक शेती करत असल्याचे निदर्शनास येत आहे. जे शेतकरी स्वतः शेतामध्ये राबतात तोच खरा शेतकरी आहे. ऊस पिक हे शेतकऱ्यांचे हमीचे पिक आहे. ऊस पिक हे असे पिक आहे की, त्यापासून साखर, इतर उपपदार्थ व ऊर्जा निर्मितीचे उद्योगासाठी कच्चा माल पुरविणारे एकमेव पिक आहे. यापिकाच्या खोडकी पासून ते वाड्यापर्यंतचा सर्व भाग उपयुक्त आहे. ऊस पिक हे देशाची अर्थ व्यवस्थेचे योगदान ठरविणारे पिक आहे. मागील गळीत हंगामामध्ये पाऊसमान चांगले होते. परंतु ऊसाचे उत्पादनामध्ये म्हणावे तसे उत्पादन न मिळता त्यामध्ये घट झाल्याने साखर कारखान्यांचे गळीत हंगाम लवकर आटोपले. सध्या महाराष्ट्रातील साखर कारखाने पुर्ण क्षमतेने व १५० दिवस चालणेसाठी व वेळे अगोदरच गाळप हंगाम आटोपता घेणेचे वेळ टाळणेसाठी आत्तापासून साखर कारखान्यांनी आशा प्रकारची शिबीरे आयोजित करुन आपल्या स्टॉफला नवीन तंत्रज्ञानाची माहिती अवगत करुन देणे हे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात प्रथमच आपले कारखान्याचे चेअरमन आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हंगाम २०२५-२६ साठी शेती विभागासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले असल्याने त्यांना मी धन्यवाद देतो व अशी शिबीरे महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी घ्यावीत असे मी सर्वांनी आवाहन करतो.
सदर शिबीरा प्रसंगी नेटाफिम कंपनीचे सेल्स मॅनेजर श्री मल्लीनाथ जट्टे यांनी ऊस पिकासाठी ठिबक सिंचन हे कसे उपयुक्त आहे, याची सविस्तर माहिती प्रात्यक्षीकाव्दारे उपस्थितांना पटवून दिले व श्री सतिश माने यांनी ऊस पिकासाठी रासायनिक खत वापरण्याची तंत्र पटवून दिले. तसेच श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बालाजी घाडगे यांनी ऊस पिकातील रोग व किड यावरील उपाययोजनाची सविस्तर माहिती दिली. प्रा. श्री ज्ञानसागर सुतार यांनी ऊस पिकातील कृत्रीम बुध्दीमत्तेचा (एआय) चा वापराबाबती माहिती दिली.
हे शिबीर यशस्वी होणेसाठी कारखान्याचे केन मॅनेजर श्री आबासाहेब वाघ, मुख्य शेती अधिकारी श्री गुळमकर, असि. ऊस विकास अधिकारी श्री उध्दव बागल व शेती विभागातील इतर स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, कालिदास साळुंखे, श्री विठ्ठल रणदिवे तसेच कारखान्याचे अधिकारी, शेती विभागाचा सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेती कमिटीचे चेअरमन व संचालक श्री दत्तात्रय नरसाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानल. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री विठ्ठल प्रशालेचे श्री आर्वेसर व ऊस पुरवठा अधिकारी श्री नितीन पवार यांनी केले.