प्रथम वर्ष डी.फार्मसी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया शनिवार पासून सुरु
२ ऑगस्ट पर्यंत करता येणार रजिस्ट्रेशन
छायाचित्रः- स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह, फार्मसी चिन्ह व प्राचार्य प्रा. सतीश मांडवे.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या बारावी सायन्स नंतरच्या डी.फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा जाहीर झाल्या असून शनिवार, दि १० जुलै २०२१ पासून ते सोमवार, दि. ०२ ऑगस्ट २०२१ अखेर पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी ), पंढरपूरचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी दिली.
या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेनंतर गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर दिनांक ०५ ऑगस्ट २०२१ रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती दि.०६ ते ०८ ऑगस्ट या दरम्यान करता येईल. यानंतर दि.१० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांकडे आपल्या प्रवर्गानुसार योग्य ती कागदपत्रे असणे आवश्यक आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली व प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली या सुविधा केंद्राचे कामकाज सुरु आहे. याचा लाभ बारावी उत्तीर्ण व ज्यांना डी.फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थी व त्यांच्या पालकांना घेता येणार आहे. या कालावधीत प्रमाणपत्रांची पडताळणी, छाननी व नोंदणी आदी प्रक्रियेनंतर मुख्य कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया चालू होणार आहे. पंढरपूर परिसर पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागणीनुसार सन २००६ साली हे महाविद्यालय स्थापन झाले असून शिस्त व संस्कार यासाठी प्रसिद्ध असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत देखील सातत्याने आघाडीवर असल्याचे दिसून येते. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी प्रा. एन.ए दांडगे (मोबा.क्र. ९३७३०९१०४१) यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांनी केले आहे.