रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 95 व्या पुण्यतिथीचा सोहळा संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर : रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रयत माउली कै लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या 95 व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समारंभ समिती व सांस्कृतिक समितीच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. अशोक भोईटे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. समाधान माने होते. मंचावर रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ज्योतिराम भायगुडे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. तुकाराम अनंतकवळस, डॉ. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, डॉ. अनिल चोपडे, पर्यवेक्षक विठ्ठल काटकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “रयत शिक्षण संस्था ही लक्ष्मीबाई व भाऊराव पाटील यांच्या त्यागातून उभारलेली आहे. समाजातील उपेक्षित, बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षण हेच एकमेव ध्येय मानून त्यांनी अविरत परिश्रम घेतले. आपल्या दागिन्यांपासूनही त्याग करून शिक्षणासाठी योगदान दिले.”
प्रभारी प्राचार्य डॉ. समाधान माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, “महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यासारखेच योगदान लक्ष्मीबाई आणि भाऊराव पाटील यांनी दिले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांचा त्याग आजही प्रेरणादायी आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. बाळासाहेब बळवंत यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे आणि प्रा. सारिका भांगे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद, कर्मचारी, पत्रकार जैनुद्दीन मुलाणी, डॉ. विकास कदम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिष्टान्न वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.