श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
वेणुनगर, दि. ३० : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२०२६ चा ४३ वा गळीत हंगामाचा सांगता समारंभ आमदार अभिजीत आबा पाटीलसाहेब, चेअरमन यांचे प्रमुख उपस्थितीत संचालक, श्री कालिदास शंकर साळुंखे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुलभा कालिदास साळुंखे या उभयतांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजेने दिनांक १४.०२.२०२६ रोजी दु. ३.१५ वाजता सांगता समारंभ संपन्न झाला.
सदर प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड म्हणाले की, मा. आमदार श्री अभिजीत आबा पाटीलसाहेब, चेअरमन यांचे मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडून सदर गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, बैलगाडीवान तसेच अधिकारी, कामगार, कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केलेबद्दल त्यांनी कौतुक करुन आभार मानले. सदर प्रसंगी ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर मालकांचे सत्कार करणेत आले.
सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, सुरेश भुसे, धनंजय काळे, सचिन वाघाटे, सिध्देश्वर बंडगर, तज्ञ संचालक अशोक तोंडले, निमंत्रित संचालक अशोक घाडगे, वर्क्स मॅनेजर यु.के. तावरे, केन मॅनेजर ए.डी.वाघ, चिफ केमिस्ट बी. आर. माने, डिस्टीलरी मॅनेजर एन. एस. सोळंके, लेबर अॅण्ड वेल्फेअर ऑफिसर बी.एस. पाटील, मुख्य शेती अधिकारी ए. व्ही. गुळूमकर, केनयार्ड इंन्चार्ज श्री जे.ए. सलगर, सि. कॉम्प्युटर प्रोग्रामर एस.पी.गुंड यांचेसह कारखान्याचे सभासद, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



