Uncategorized

पंढरपूर तालुका आरोग्य विभागाला उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार

महाराष्ट्र शासनाद्वारा “भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची“ अंतर्गत पुरस्कार प्रदान

फोटो-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघनाताई साकोरे -बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना डॉ. एकनाथ बोधले, डॉ. डोईफोडे, डॉ. महेश सुडके, डॉ. नितीनकुमार सरडे 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारा “भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची“ अंतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार पंढरपूर तालुक्यास प्राप्त झाला आहे. पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी हा पुरस्कार मुंबई येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते नुकताच स्वीकारला. या पुरस्कारामुळे पंढरपूर तालुक्याची मान उंचावली असून, येथील आरोग्य विभागात मोठे चैतन्य पसरले आहे.

भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची, या अंतर्गत हा पुरस्कार दिला जातो. भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची,, हा उपक्रम दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान देहू आळंदी ते पंढरपूर या मार्गावर आरोग्य सुविधा देऊन राबविला जातो. या उपक्रमांतर्गत या मार्गावर विनामूल्य आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाते. आरोग्य तपासणी, औषधे आणि आपत्कालीन सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या मार्गावर आरोग्य दूत तैनात करून जे पाऊले चालती पंढरीची वाट, आरोग्य दूत देईल आरोग्यास साथ, या उक्तीप्रमाणे आरोग्य दूत कार्य करत असतात. याचवेळी वारीमध्ये होणाऱ्या आजारांवर तात्काळ निदान आणि मोफत औषधे पुरवली जातात. वारी दरम्यान स्वच्छतेबाबत आणि साथीच्या आजारांबाबत वारकऱ्यांमध्ये जागृती पसरवली जाते.
या उपक्रमा अंतर्गत पंढरपूर तालुक्यास उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार जाहीर करण्यात झाला होता. हा पुरस्कार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, सिव्हिल सर्जन डॉ. डोईफोडे, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.विजयकुमार सरडे यांनी मुंबई येथे स्वीकारला.

यात्रा कालावधीत पालखी मार्ग तसेच शहर व तालुक्यात भाविकांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविल्या आहेत. त्याचीच पोहच पावती म्हणून राज्य शासनाकडून पंढरपूर तालुका आरोग्य विभागाला पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. यामुळे काम करण्यासाठी अधिक ऊर्जा मिळाली आहे. या पुरस्कारामुळे पंढरपूर तालुक्याची मान उंचावली आहे.
-डॉ. नितीनकुमार सरडे
वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close