Uncategorized

आदर्श शाळा आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचा मानस : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम विद्यालय येथील संत गाडगे महाराज-चोखामेळा विद्यार्थी वसतिगृहास भेट देऊन पाहणी

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार;

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

पंढरपूर, दि. २८ : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच उत्तम निवास व्यवस्था आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच पंढरपूरमध्ये उच्च शिक्षणाच्या विविध संधी आणि शैक्षणिक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देऊन आदर्श शाळा आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. ना. अण्णा बनसोडे यांनी केले.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम विद्यालय येथील संत गाडगे महाराज-चोखामेळा विद्यार्थी वसतिगृहास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वसतिगृहातील निवास व्यवस्था, शैक्षणिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अन्य सोयी-सुविधांची माहिती घेतली.

तसेच संस्थेच्या मालकीच्या कराड रोडवरील वखार महामंडळाशेजारील रिकाम्या जागेचीही त्यांनी पाहणी केली. या जागेवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व निवासी सुविधांसाठी इमारतीचे बांधकाम करून आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपूरमधील शैक्षणिक संस्थांच्या विकासासोबतच उच्च शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच उच्च शिक्षण अभ्यासक्रम , शैक्षणिक व व्यावसायिक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम पंढरपूरमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यामुळे पंढरपूर शहरासह परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावरच विविध शिक्षण व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल, असेही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. संस्थेच्या उपलब्ध जागेचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक विकासकामांचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य सुनील सर्वगोड, सदस्य चंद्रशेखर कांबळे, गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन कांबळे, वस्तीगृह अधिक्षक नंदकुमार वाघमारे तसेच गौतम विद्यालयाचे शिक्षक तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close