Uncategorized

पंढरपुरातील प्रभाग १७ साठी ५ कोटींचा निधी मंजूर

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; प्रभाग क्रमांक १७ चा चार दशकातील रखडलेल्या विकासाचा बॅकलॉक होणार पूर्ण   

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

पंढरपूर / प्रतिनिधी:पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ च्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आपल्या निष्ठावंत एकनिष्ठ शिलेदारसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या शिफारशीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत हा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये रस्ते विकासासाठी ३ कोटी ७० लाख, तर शाळांचे नूतनीकरण आणि व्यायामशाळेच्या उभारणीसाठी १ कोटी ३० लाख रुपयांचा समावेश आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याची माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

प्रभागातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, शाळांlची दुरुस्ती, सुशोभीकरण, पथदिवे, व्यायाम शाळा तसेच अभ्यासिकेचे बांधकाम यांसह विविध विकासकामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी दिलीप धोत्रे यांनी केली होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी शिफारस केली. या शिफारशीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने प्रभागातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.

यामधील मंजूर ३ कोटी ७० लाखांच्या निधीतून प्रभागातील आठ रस्त्यांची कामे होणार आहेत. यामध्ये रमाई नगरमधील रस्ता, म्हसोबा मंदिर ते दत्ता थोरात यांच्या घरापर्यंतचा रस्ता, सात नंबर शाळा ते नऊ नंबर शाळेपर्यंतचा रस्ता यांसह विविध अंतर्गत रस्त्यांचा समावेश आहे.

तर वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून नगरपरिषदेच्या सात नंबर शाळेच्या नूतनीकरणासाठी ५० लाख, नऊ नंबर शाळेसाठी ४० लाख आणि नगरपरिषदेच्या जागेत व्यायामशाळा उभारण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर झाले आहेत.

या निधीच्या मंजुरीबद्दल दिलीप धोत्रे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. या विकासकामांमुळे प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार असल्याने जनतेला दिलेले आश्वासन सत्यात उतरवले जात असल्याने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वरील जनतेचा विश्वास अधिकच वाढला आहे.

यावेळी दादा क्षीरसागर, जगदीश लकेरी, बापू खिलारे, दादा घोडके, लक्ष्मण रणदिवे, सुदेश खिलारे, पिंटू गायकवाड, पप्पू बांदपट्टे, दिनेश पांढरे, संतोष वाघमारे, दत्ता थोरात, संतोष गायकवाड, नागेश इंगोले इत्यादी उपस्तित होते.

निवडणुकीच्या वेळी प्रभागातील नागरिकांना माधुरी धोत्रे आणि लोकेश यादव यांच्या माध्यमातून विकासकामांची जी आश्वासने दिली होती, ती आता प्रत्यक्षात पूर्णत्वास जात आहेत. पाच कोटींच्या निधीमुळे प्रभागातील रस्ते, शैक्षणिक सुविधा आणि क्रीडा सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्व कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली जाणार आहेत.— दिलीप बापू धोत्रे, मनसे नेते

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close