देगांव येथील पहिली डॉक्टर कु.. प्रतीक्षा वायदंडे हिचा देगावकरानी केला सत्कार..!
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-अत्यंत प्रतिकूल परस्थितीतुन शिक्षण घेऊन कु. प्रतीक्षा बापूराव वायदंडे ही बी. एच.एम. एस. ही वैद्यकीय पदवी उत्तीर्ण होऊन देगांव येथे पहिली डॉक्टर झाले बद्दल देगांव ता. पंढरपूर येथील मातंग समाज व ग्रामस्थाचे वतीने भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.
ग्रामस्थाचे वतीने फेटा, शाल,पुष्पहार व फकिरा कादंबरी देऊन जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे यांचे हस्ते डॉ. प्रतीक्षा वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी माजी सरपंच संजय घाडगे होते.
यावेळी श्रीकांत कसबे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रगल्भ समाजाची व्याख्या केली आहे की ज्या समाजात 10 डॉक्टर 20 वकील 30 इंजिनिअर असतील तो समाज प्रगल्भ आहे असे समजले पाहिजे. याचे चिंतन करणे अत्यंत गरजेचे आहे. 75 वर्षात देगांव गावातून पहिली डॉक्टर म्हणुन कु. प्रतीक्षा वायदंडे हिने मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. तिने एवढ्यावरच न थांबता एम. डी. व्हावे. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हावे.अ शा शुभेच्छा देवून..तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले.. तसेच सरकार आरक्षण खतम करण्यासाठी शिक्षण व नोकऱ्याचे खाजगीकरण करत आहे या बाबीकडे सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. व लढा उभा केला पाहिजे असे स्पष्ट केले. प्रतीक्षाचे पाठीमागे खंबीर पणे उभे राहिल्याबद्दल तिच्या आई वडिलांचे अभिनंदन केले.
लहुजी शक्तीसेनेचे प. म. सचिव देविदास कसबे आपल्या मनोगतात म्हणाले की,75वर्षात या गावात एक ही डॉक्टर होऊ शकला नाही ही एकी कडे खंत आहे. तर दुसरीकडे प्रतीक्षा डॉक्टर झाली याचा आनंद आहे. ही प्रेरणा सर्व माता पित्यांनी घेऊन आपली मुले शिकवली व घडवली पाहिजेत.
सरपंच संजय घाडगे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की. आमच्या गावातील कन्या डॉक्टर झाली ही आमचीसाठी अभिमानाची बाब आहे. आज सरकारी शाळा विध्यार्थ्यां आभावी बंद पडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आमदार खासदारांना 20बॉडीगार्ड आहेत पण 20विदयार्थ्यांना 1शिक्षक नेमू शकत नाहीत ही शोकांतिका आहे. शिक्षण खाजगी झाले तर सर्वसामान्यांना परवडणार नाही. ही बाब चिंतनीय आहे.
सरकारी योजना पदरात पाडून घ्यायच्या असतील तर रेशन कार्ड मध्ये नाव नोंदणे, आधार कार्ड काढणे गरजेचे असते. पण याबाबी सुद्धा आम्ही दुर्लक्षित करतो.अशी खन्त त्यांनी व्यक्त केली.
प्रतीक्षाचे वडील बापूसाहेब वायदंडे यांनी आपल्या मुलीवर” सावित्रीची लेक “ ही कविता सादर केली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रतीक्षा म्हणाल्या की माझ्या यशाचे श्रेय माझे आई, वडील, भाऊ आणि वहिनी यांना देते. त्यांच्या पाठिंब्यामुळे मि हे यश मिळवू शकले. जिद्द व चिकाटी असेल तर कुठलीही ऍकडमी व मोठे महाविद्यालय नसले तरी यश मिळविता येते. असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरपरिषद कामगार नेते धनाजी वाघमारे, लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद घाडगे, सागर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग वाघमारे , मेंबर सुभाष घाडगे, समाजसेवक मल्हारी चव्हाण, आण्णा भाऊ साठे युवक संघटनेचे अध्यक्ष नागेश यादव, सागर वाघमारे ,पप्पू मुलाणी, चांद लांडगे, पंढरी लोखंडे,सिनेकलावंत रामभाऊ देऊकुळे, राजू यादव, लहुजी शक्ती सेनेचे उपप्रमुख शरद लोखंडे, तालुका उपप्रमुख समाधान वायदंडे ,तालुका संघटक बाळासाहेब वायदंडे मेंबर, मेंबर कैलास वायदंडे, धनंजय वायदंडे,किसन वायदंडे, तात्या वायदंडे, शहाजी वायदंडे, आण्णा वायदंडे,व गावातील इतर लहान थोर महिला बंधू- भगिनी उपस्थित होते.. आदी उपस्थित होते.
देगांवचे नुतन सरपंच सौ भाग्यश्री समाधान घाडगे, सोमनाथ जाधव, सिनेकलावंत चांगदेव दावणे, मेंबर बाळासाहेब वायदंडे, समाजसेवक धनंजय वायदंडे, सामाजिक कार्यकर्ते तात्या वायदंडे, सिनेअभिनेते व तालुका उपाध्यक्ष समाधान वायदंडे,
आणि शिक्षण
मुख्याध्यापक सुरसेन बुधवंत सर, गुरू पाटोळे सर, विजय बंगाळे, हिरालाल भोई, बाळासाहेब पवार सर ,सुनिता कुलकर्णी माडम, वाघमारे माडम, गुरसाळकर माडम व संपूर्ण वायदंडे हे उपस्थित होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव यांच्या वतीने ही डॉक्टर प्रतीक्षा वायदंडे यांचा सत्कार करण्यात आला.