मयत अनुदानाला सुद्धा 2002 च्या दारिद्र्यरेषेच्या नावाची अट असणे दुर्दैवी –जिल्हाध्यक्षा- सौ. संगीता हावगुंडे
पुरोगामी संघर्ष परिषद जिल्ह्यात प्रबोधन अभियान राबविणार
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली:- दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच ( बीपीएल )कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री जर मृत्यू पावली तर त्या कुटुंबाला शासकीय अनुदान म्हणून 20,000/-(वीस हजार) रुपये मिळतात.पण त्यासाठी सदर कुटुंबाचे नाव हे 2002 च्या दारिद्र्य रेषेच्या यादीत समाविष्ट असणे ही अट घातल्यामुळे आणि त्यासाठीचे म्हणजेच दारिद्र्यरेषेत नावाचा समावेश होण्यासाठीच्या उत्पन्नाची मर्यादा तोकडी असल्यामुळे याचा कुटुंबांना लाभ होत नसल्यामुळे अशा उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना मिळणाऱ्या शासनाच्या अनुदानाला जर दारिद्र्य रेषेचे अट असेल तर हे खूप मोठं दुर्दैव असल्याचे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगली युवती जिल्हाध्यक्षा सौ. संगीता हावगुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे बोलताना संगीता हवगुंडे यांनी म्हटले आहे की,सदर योजना बऱ्याच कुटुंबांना माहित नसल्यामुळे या योजनेचा म्हणावा तसा लाभ मिळालेला नसुन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने नागरिकांचे प्रबोधन अभियान राबवून सदर अनुदानासाठी तलाठी, तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करता येतो याची माहितीही देणार असल्याचे म्हटले आहे.