Uncategorized

अभिजीत पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवा- जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष)

अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून लवकरच उर्वरित गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार 

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर प्रतिनिधी/-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पंढरपूर मंगळवेढा दौऱ्यावर असताना टेंभू म्हैसाळ योजनेसाठी उर्वरित पाणी वितरणाबाबत हुन्नूर येथे पाणी परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे अयोजन राष्ट्रवादीचे नेते,श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

येथील ३५ गावांचा ज्वलंत प्रश्न तत्कालीन स्व. आमदार भारत भालके नाना नेहमीच मांडायचे. या योजनेसाठी पाणी साठा परवाना कमी असल्याने महाविकास आघाडी सरकार काळात अतिरिक्त 1 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले. तसेच जत कालवा मंगळवेढा वितरीका १ व अन्य वितरिकांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यातील ६००० हेक्टर क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे हि तत्कालीन मा. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत असताना मागील २.५ वर्षाच्या काळात या योजनेला गती देण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी सरकारने मागील १ वर्षाच्या काळात कोणतेही ठोस काम या योजनेसाठी केले नसल्याचे प्रामुख्याने दिसून येते.

सध्या राज्यातील पावसाची परिस्तिथी पाहता या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून देखील सरकारला जाग येत नाही. इथला शेतकरी हवालदिल झालेला असताना देखील सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सध्याचे सरकार पालकमंत्री पद वाटपामध्येच अडकुन पडले असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले.

यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, निरिक्षक शेखर माने,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राहुल शहा, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष मुझमिल काझी, नगरसेवक विजयकुमार खवतोडे, माऊली कोंडूभैरी, जमीर इनामदार, माणिक गुंगे, अमित मम्हाणे, अण्णा शिरसाट, अशोक रणदिवे, प्रदीप खरतोडे, नागेश फाटे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, गणेश पाटील तसेच पंचक्रोशीतील अनेक शेतकरी मंडळी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close