Uncategorized

१९ व्या युवा महोत्सवासाठी ‘स्वेरी कलापंढरी’ सज्ज ।

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

-श्रीकांत कसबे

पंढरपूर, दि. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाचा १९ वा  युवा महोत्सव पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023रोजी सकाळी दहा वाजता होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत उद्द्घाटन सोहळा  पार पडणार असल्याची माहिती स्वेरीचे संस्थपाक व सचिव तथा स्वैरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंगळवारी सकाळी दहा वाजता सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी , मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख व युवा लोक कलावंत डाँ.गणेश चंदनशिवे,सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.. अध्यक्षस्थानी पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर असतील दि.१० ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित वाड.मय,संगीत व लोककला विभागातील एकूण  ३९   कलाप्रकारांच्या स्पर्धा या युवा महोत्सवात होणार आहेत. सुमारे ६०महाविद्यालये आणि जवळपास १६०० पेक्षा जास्त विद्यार्थी कलाकारांचा या सहभाग राहील मध्ये सहभाग राहील असा अंदाज आहे.

स्वेरीच्या युवा चेतना रॅलीने काही प्रातिनिधिक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी रसिकांना या युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी कलावंतांनी था वी चेतना रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला आहे.

युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजत रजिस्ट्रेशन, उद्घाटन समारंभ, संघ व्यवस्थापकांची बैठक झाल्यानंतर स्पर्धाना सुरुवात होईल, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, भजन, प्रश्नमंजुषा (लेखी), मराठी-हिंदी-इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, भारुड, काव्यवाचन, भितीचित्रण, मेहंदी, लावणी आणि एकांकिकेचे सादरीकरण महोत्सवाच्या पहिल्या दिवशी होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, दि. ११ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पोवाडा, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, लोक वाद्यवृंद, जलसा, शास्त्रीय सुरवादय, कथाकथन, मिमिक्री, व्यंगचित्र, कव्वाली आणि एकांकिका आदी स्पर्धा पार पडतील, गुरुवार दि. १२ ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा (तोंडी), निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, पाश्चात्य समूहगायन, प्रहसन, पाश्चिमात्य वादन, रांगोळी, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील.

शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी एक वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे आणि युवा अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर है असतील तर कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.देवानंद चिलवंत आणि वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहे.

यंदाच्या ‘उन्मेष सृजनरंगाचा’ या युवामहोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. पाऊस आला तरी विना व्यत्यय स्पर्धा सुरु राहाव्या अशा पद्धतीने रंगमंच व्यवस्थापन केलेले आहे. सर्व रंगमंच्यासाठी उत्तम दर्जाची साऊंड तसेच लाईट व्यवस्था याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ३० समित्यांचे गठन करण्यात आले असून, त्यांच्याद्वारे महाविद्यालयाचे संस्थापक व सचिव प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सघाव्यस्थापक, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, युवा महोत्सव आयोजन समिती सदस्य डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. डी. जी. शिंदे यांच्या पथकाने सर्व तयारीची पाहणी करून त्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

‘          ट्रेड एक्स्पो – २०२३’ चे खास आकर्षण

युवा महोत्सवाचे औचित्य साधून स्वेरी नेहमी काही नवीन उपक्रम राबवित असते. याच परंपरेचा भाग म्हणून एम. बी. ए. विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ या उद्योग महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यामुळे रसिकांना एकाच महोत्सवात सांस्कृतिक आणि व्यवसाय क्षेत्रातील अश्या दोन महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.

जिल्हयातील कलावंतांची जपली स्मृती

मुख्य रंगमंचाला कला वारकरी मुख्य रंगमंच, तर लोककलेच्या रंगमंचाला प्रसिद्ध लोककलावंत लावणीसम्राट कै. ज्ञानोबा (माऊली) यांचे नाव देण्यात आलेले आहे. वाड्मय कलाप्रकार जेष्ठ मराठी साहित्यिक कै. द. मा. मिरासदार शब्दांगण मंचावर तर संगीत कला प्रकार जेष्ठ गायक के प्रल्हाद शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. ललितकला प्रकाराच्या स्पर्धा कै. कवी संजीव स्मृती कलादालनात पार पडणार आहेत.

या पत्रकार परिषदेस संस्थेचे अध्यक्ष श्री. दादासाहेब रोंगे, जेष्ठ विश्वस्त श्री एन. एस. कागदे, जे विश्वस्त श्री. एच. एम. बागल, जेष्ठ विश्वस्त श्री. धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे कॅम्पस प्रमुख डॉ. एम. एम. पवार, डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ फार्मसी कॉलेज प्राचार्य डॉ. मणियार, डी. फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डाँ.. मांडवे, शैक्षणिक विभाग अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, सांस्कृतिक विभाग व संवादप्रमुख डॉ. यशपाल खेडकर, समन्वयक प्रा. करण पाटील, डॉ. महेश मठपती, डॉ. डी. एस. चौधरी विविध विभागांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close