Uncategorized
मोनाली भिसे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कठोर कारवाई करा
पंढरपुरात सकल मातंग समाजाची निवेदनाद्वारे मागणी हॉस्पिटलवर कारवाई न केल्यास राज्यभर मातंग समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करणार


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर-महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे साहेब यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी सौ.मोनाली (तनिषा) सुशांत भिसे यांना प्रसुती करिता पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्यावेळी हॉस्पिटल प्रशासनाने प्रथमत: 20 लाख रूपये भरण्यास सांगितले त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर 10 लाख रूपये तरी भरावे लागतील असे सांगितले त्यावेळी नातेवाईकांनी 3 लाख रूपये सध्या आमच्याजवळ आहेत ते भरून घ्यावेत व बाकीचे पैसे नंतर भरतो तुम्ही उपचार सुरू करा असे सांगितले.त्यावर हॉस्पिटल प्रशासनाने पुर्ण पैसे भरल्याशिवाय आम्ही रूग्णास दाखल करून घेणार नाही असे सांगितले. हा सर्व प्रकार मोनाली भिसे यांच्यासमोरच हॉस्पिटल प्रशासनाने सांगितला त्यामुळे रूग्णास त्याचा आणखी धक्का बसला.
त्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाशी संपर्क केला त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलशी संपर्क केला मात्र त्यास हॉस्पिटल प्रशासनाने दखल घेतली नाही. रूग्णास वेळेत दाखल करून न घेतल्याने रूग्णाची तब्येत बिघडत असल्याने सर्वोदय या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भिसे यांना दाखल केले त्यावेळी 2 लहान जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र त्यावेळी दुर्दैवाने मोनाली भिसे यांचा मृत्यू झाला. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने वेळेत उपचार केले असते तर आज मोनाली भिसे या जीवंत असत्या व 2 लहान मुलींना आईपासून पोरके व्हावे लागले नसते.या संतापजनक घटनेचा पंढरपुरातील सकल मातंग समाजाच्यावतीने पंढरपूर येथील तहसिलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देवून निषेध करत दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पिडीत कुटूंबियास शासनाने सर्वोपचारी शासकीय मदत लवकरात लवकर देण्यासंबंधीची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. सदरच्या हॉस्पिटलवर कारवाई न केल्यास राज्यभर मातंग समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी नगरसेवक कृष्णा वाघमारे, माजी नगरसेवक महेश साठे, धनंजय वाघमारे, ऍड.किशोर खिलारे, जयसिंंग मस्के,देविदास कसबे, दत्ताभाऊ जगताप, महावीर कांबळे, अशोक वायदंडे, राहुल मस्के, उमेश वाघमारे, गणेश वाघमारे, संजय लोखंडे, रफिक मुलाणी, तात्यासाहेब साठे, अजित खिलारे, विठ्ठल कसबे, दयानंद साठे, दत्ता थोरात अशा विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
