राष्ट्रवादी महिला काँग्रेस – महिला आघाडीचे वतीने “दुष्काळ आणि महिलांचे प्रश्न” महिलांशी जनसंवाद !!
महिला आघाडीच्या पदाधिकारीकडून महाराष्ट्रभर घर-घर सर्वेक्षण सुरु : डॉ. फौजिया खान

“
जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर :-अस्मानी संकट ही जगभर येतच राहतात. पण त्याला सुलतानी साथ मिळाली. म्हणजेच या नैसर्गिक आपत्तीत शासन, प्रशासन उदासीन, असंवेदनशील असले, तर सामान्य जनतेचे जगणे मुश्किल होते.
सध्या महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. या दुष्काळाचा सगळ्यात जास्त परिणाम कुटुंबातील महिलांवर होतो आणि तो परिणाम वेगळ्या पद्धतीने आणि असमान प्रमाणात होतो. भारत सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन धोरणात हे अगदी स्पष्टपणे नमूद केले आहे की आपत्ती निवारणाच्या मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.
म्हणून “दुष्काळ आणि महिलांचे प्रश्न – महिलांशी जनसंवाद हा कार्यक्रम घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या पदाधिकारी महाराष्ट्रभर घर-घर सर्वेक्षण करीत आहोत. अशी भूमिका डॉ. फौजिया खान राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार )महिला काँग्रेस यांनी दुष्काळ महिलांचे प्रश्न या विषयावर आयोजित केलेल्या जोगेश्वरी मिसळ हॉल येथील कार्यक्रमात व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी आमदार अभिजीत आबा पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, राज्य महिला आशाताई मिरगे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.कविताताई म्हेत्रे, वर्षाताई निकम जिल्हाध्यक्ष यवतमाळ, महिला उपाध्यक्ष कोमल ताई साळुंखे ढोबळे, अंजलीताई साळवे आदी उपस्थित होते.
दुष्काळाचा परिणाम केवळ शेती आणि शेतीच्या उत्पन्नावर होत नाही, तर त्याचा महिलांच्या पाणी, रोजगार, आरोग्य, पोषण, सुरक्षितता आणि मुलांच्या शिक्षणावरही गंभीर परिणाम होतो. महिला जनसंवादातून समोर आलेल्या गरजांवर आधारित प्रमुख
शासनाकडे प्रमुख मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये खालील मागण्याचा समावेश आहे.
१. पाणीटंचाई आणि महिलांचे कष्ट कमी करण्यासाठी :
तातडीने निधी द्यावा. प्रत्येक गावात महिलांच्या सहभागाने ग्रामस्तरीय पाणी व्यवस्थापन समिती विहिरीचे पुनर्भरण, बोअरवेलची तपासणी आणि नवीन पाणी स्रोत विकसित करण्यासाठी स्थापन करावी.
२. महिलांना थेट आर्थिक मदत :
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील विधवा महिलांना स्वतंत्र आर्थिक सहाय्य, एकल, वृद्ध, अनुदान, कर्जफेडीत सवलत / मुदतवाढ, व्याज अनुदान द्यावे, रोजगार गमावलेल्या महिलांसाठी मजूर महिलांचे निवृत्तिवेतन वाढवावे. दुष्काळामुळे उत्पन्न बंद झालेल्या महिला बचत गटांना विशेष विशेष निर्वाह निधी आणि सामाजिक सुरक्षा योजनांसाठी विशेष शिबिरे घ्यावीत.
३. महिलांसाठी रोजगार आणि रोजगार हमी :
महिलांना त्यांच्या गावातच रोजगार मिळेल अशी कामे सुरू करावीत. रोजगार हमीच्या कामावर समान वेतन, वेळेवर मजुरी, पिण्याचे पाणी, सावली, स्वच्छतागृह आणि लहान मुलांसाठी पाळणाघरांचो व्यवस्था करावी. जलसंधारण, शेततळी, नाला खोलीकरण, वृक्षलागवड, मृदसंधारणच्या कामात स्थानिक महिलांना प्राधान्याने रोजगार द्यावा.
४. महिलांचे आरोग्य आणि पोषण :
गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि सहा वर्षांखालील मुलांसाठी विशेष पोषण अभियान, अंगणवाडीतून नियमित सकस आहार, हिमोग्लोबिन तपासणी, मोफत आरोग्य शिबिरे (रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय), दुर्गम गावात फिरती आरोग्य पथके, मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी साधने मोफत / परवडणाऱ्या दरात, स्वच्छ व सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि कुपोषित कुटुंबांना प्राधान्याने पोषण सहाय्य द्यावे.
५. महिला शेतकरी आणि शेतमजुरांसाठी विशेष मदत :
शेतीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता आणि नोंदणी मोहीम राबवावी, सातबारा उताऱ्यावर नाव नसले तरी त्यांना कृषी सहाय्य योजनांचा लाभ देण्यासाठी निकष सुलभ करावेत.
६. मुलींचे शिक्षण आणि बालसंगोपन :
स्थलांतरित मज्रांच्या मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी तात्पुरत्या शैक्षणिक सुविधा आणि शाळांशी समन्वय करावा.
७. महिला बचत गट आणि स्वयंरोजगार :
मार्गदर्शन द्यावे. बंद पडलेल्या महिला लघुउद्योगांना पुन्हा सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य व तांत्रिक
ग्रामीण महिलांना डिजिटल बँकिंग, आर्थिक साक्षरता आणि शासकीय योजनांसाठी अर्ज करण्याचे प्रशिक्षण द्यावे.
८. महिलांची सुरक्षितता आणि सामाजिक संरक्षण :
संकटग्रस्त, एकल, परित्यक्ता, विधवा, निराधार महिलांसाठी गावपातळीवर विशेष मदत कक्ष सुरू करावेत. आर्थिक तणावाच्या पाश्वभूमीवर कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी समुपदेशन, कायदेशीर मदत आणि संरक्षण सेवा द्यावी. कोविड काळात वाढलेल्या कौटुंबिक हिंसाचाराला संयुक्त राष्ट्रसंघाने ‘मूक महामारी’ म्हटले होते. तालुकास्तरावर नियमित महिला जनसुनावणी, विधवा पेन्शन, निराधार सहाय्य आणि सामाजिक सुरक्षा लाभ वेळेत मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि पेन्शनची रक्कम वाढवावी.
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांमध्ये महिलांच्या गरजांना स्वतंत्र प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, ही आमची शासनाकडे प्रमुख मागणी आहे. असे त्यांनी शेवटी म्हटले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी का महिला काँग्रेसच्या अनेक महिला उपस्थित होत्या. त्याने आपले म्हणणे लेखी स्वरूपात वरिष्ठाकडे पोहोच केले.



