रमजानसण निमित्त पंढरीतील मुस्लिम महिलांना साडी वाटप


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर:- सध्या रमजानचा महिना असल्याने , पंढरपूर शहरात सर्वत्र पवित्र वातावरण आहे.समाजातील सर्वच अबालवृद्ध
महिला मनोभावे उपवास करत असतात , या पवित्र सणात
मुस्लिम महिलांना साड्या वाटप करण्याचे काम येथील माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे आणि समाजसेवक अशोक उर्फ पिंटू शिंदे यांनी केले. यावेळी महिलांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
- रमजान महिना हा मुस्लिम समाजात पवित्र महिना मानला जातो. या काळात उष्णता अधिक असल्याने , शरीरास पौष्टिक अशा शीरकुर्मा पदार्थाची लयलुट केली जाते. बदाम, अक्रोड याशिवाय इतर ड्रायफ्रूट यांचे सेवन केले जाते. या सणात खरेखरे हिंदू मुस्लिम ऐक्य पहावयास मिळते.
पवित्र रमजान सणाचे औचित्य साधून , पंढरपूर शहरातील संत पेठ, न्यू बागवान मोहल्ला ,आराम गादी कारखाना परिसर आणि देवकते मळा परिसरात मुस्लिम महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले.
येथील माजी नगराध्यक्ष वामन बंदपट्टे आणि समाजसेवक अशोक उर्फ पिंटू शिंदे यांनी महिलांना भरभरून साड्यांचे वाटप केले. या पवित्र रमजान सणात महिलांना आर्थिक हातभार लावण्याचे काम , त्यांनी केल्याने त्यांचे मुस्लिम बांधवांकडून कौतुक करण्यात आले.



