मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज सोलापूर जिल्हा दौरा

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
सोलापूर, दिनांक 28(जिमाका):- राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे शनिवार, दिनांक 29 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा तपशील पुढील प्रमाणे आहे.
दिनांक 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10:20 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 10.25 वाजता हेलिकॉप्टरने तुळजापूर जिल्हा धाराशिव कडे प्रयाण. सकाळी 11:45 वाजता तुळजापूर येथून हेलिकॉप्टरने पंढरपूर जिल्हा सोलापूर कडे प्रयाण. सकाळी 12:10 वाजता जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका हेलिपॅड पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आगमन. दुपारी 12.15 वाजता मोटारीने हेलिपॅड येथून मोटारीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर कडे प्रयाण. दुपारी 12.25 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आगमन व दर्शन. दुपारी 12.50 वाजता विठ्ठल मंदिर येथून शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण, जिल्हाधिकारी सोलापूर. दुपारी 1.50 वाजता शासकीय विश्रामगृह येथून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थान कडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता मोटारीने पंढरपूर रोपवाटिका हेलीपॅड कडे प्रयाण व दुपारी 2.25 वाजता हेलिकॉप्टरने प्रयाण.
********