तहसिल कार्यालय येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…
351 जणांनी केले रक्तदान
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर, दि.09: तहसिल कार्यालय पंढरपूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 351 रक्तदात्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष रक्तदान केले. या शिबीरामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेवून रक्तदान केले. अशी माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. गंभीर आजारातील रुग्णांना तसेच अपघातत जखमी होणाऱ्यांना वेळेत रक्त न मिळाल्यास जिवितास धोका होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेवून तसेच समाजाप्रती आपले काही देणे लागते या जाणीवेतून तहसिल कार्यालय पंढरपूर येथे पंढरपूर ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी जास्ती जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे या आवाहानाला प्रतिसाद देत तहसिल व दुय्यम निंबधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी , पोलीस पाटील, स्वस्त धान्य दुकानदार , सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे सदस्य, जेष्ठ आदींनी रक्तदान केले. यावेळी हनुमंत भगवानराव मोरे (वय-51वर्षे) यांनी आतापर्यंत 51 वेळा रक्तदान केले तसेच त्यांच्या कुटुबांतील सर्व सदस्यांनीही शिबिरात रक्तदान केले. रविराज जाधव व हितेश चव्हाण यांनी लातुर जिल्ह्यातून येवून रक्तदान केले. तर अनिल यलमार यांनीही आतापर्यंत 78 वेळेस रक्तदान केले. यावेळी रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन रक्तदान शिबीरात व्यवस्था करण्यात आली होती असेही, श्री बेल्हेकर यांनी सांगितले
तहसिल कार्यालयात आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीराचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबीरास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे तसेच आयोजकाचे कौतुकही यावेळी केले. तसेच जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनीही शिबीरास भेट दिली यावेळी तहसिलदार व सर्व अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तहसिलदार बेल्हेकर यांनी स्वता: रक्तदान करुन आपल्या सहकाऱ्यांना यासाठी प्रोत्साहित केले
000000