घरकुल घोटाळा प्रकरण बिडिओ व विस्तार अधिकारी यांचे वर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा करण्याची मागणी.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
*सातारा* दि.१६ बुधवार:- विठ्ठलवाडी (तुळसण) तालुका कराड येथील रामचंद्र चव्हाण या मागासवर्गीय लाभार्थ्यास विभक्त कुटुंब असताना एकत्र कुटुंबाचा शेरा व साधे घर असताना पक्के घर असल्याचा खोटा शेरा मारुन घरकुल योजनेपासून वंचित ठेवल्याबद्दल पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सातारा जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन सदर खोटी माहिती देणाऱ्या विस्तार अधिकारी व त्यांना पाठीशी घालणारे बिडीओ भाऊसाहेब पवार यांना अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करून ताबडतोब अटक करावी. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. सातारा जिल्हाध्यक्ष कृष्णात चव्हाण व युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर साठे आणि युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विक्रम साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.