मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे व त्यात धनगर आरक्षणाचाही प्रश्न मार्गी लावावा धनगर समाजाची मागणी…
राजेंनी धनगर समाजाचे ही नेतृत्व करावे...
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-मराठा आरक्षण मार्गी लागावे या साठी धनगर समाजाचा पुर्ण पाठींबा आहे.राज्यसरकारने या प्रश्नी विशेष अधिवेशन बोलवावे. तसेच”धनगर”व “धनगड”एकच आहेत असा ठराव पारीत करुन केंद्र सरकार कडे पाठवावा .अशी मागणी धनगर समाज प्रतिनिधीनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजानी अठरापगड जातीचे नेतृत्व केले.त्याप्रमाणे संभाजीराजे व उदयनराजे यांनी धनगर समाजाचेही नेतृत्व करुन रखडलेला आरक्षणाचा प्रश्न सोडविला पाहीजे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विशेष अधिवेशन बोलावून धनगर आरक्षण प्रश्न गांभिर्याने सोडवावा.अन्यथा आषाढी एकादशी दिवशीं त्यांना विठ्ठलाची शासकीय पुजा करु दिली जाणार नाही असा इशारा दिला. या मागणी साठी लवकरच राष्टवादी काँग्रेस चे नेते शरद पवार,खा.उदयनराजे, खा.संभाजीराजे,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची समाजाचे शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस शालिवाहन कोळेकर,डाँ.मारुती पाटील, आदित्य फत्तेपुरकर,परमेश्वर कोळेकर,प्राचार्य संतोष शेंडगे, पांडुरंग चौगुले,संतोष सुळे,अंकुश पडवळे विष्णु देशमुख,महेश येडगे,ईश्वर गडदे,बाळासाहेब गडदे,द्रोणाचार्य हाके,जितेंद्र पाटील,राजेंद्र वळकुंद्रे,सोमनाथ ढोणे,मंगेश झंजे,संतोष बंडगर,संतोष मासाळ सर्जैराव महारनवर,बालाजी येडगे,रवि मेटकरी,सतिश रेवे,खंडू माने,प्रशांत घोडके,आण्णा सलगर,शिवप्रसाद पुळके,शिवराज पुळके आदी उपस्थित होते.
…………