मातंग समाजाची गैर राजकीय मुळे मजबुत करणे व दोन पुस्तके प्रकाशित करणे हिच मा.धो.खिलारे यांना खरी श्रध्दाजंली असेल:रमेश राक्षे
साहित्यिक मा.धो.खिलारे यांना आँनलाईन श्रध्दाजंली अर्पण
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-फुले आंबेडकरी विचारावर प्रचंड निष्ठा असणारे,मातंग समाजाला अत्यंन्त पोटतिडकीने मार्गदर्शन करणारे धम्माचे आचरण करणारे मा.धो.खिलारे यांच्या अकस्मात निधनाने त्यांचे कुटूंबाची हानी झाली त्यापेक्षाही जास्त हानी समाजाची व चळवळीची झाली आहे.मातंग समाजाची गैर राजकीय मुळे मजबुत झाली पाहीजेत. ही त्यांची तळमळ होती.यासाठी येत्या पाच वर्षात १० हजार आंबेडकरवादी कार्यकर्ते तयार करणे व त्यांनी चळवळीवर लिहलेली दोन पुस्तकें प्रकाशित करणे हिच त्यांना खरी श्रध्दाजंली ठरेल.असे विचार जेष्ठ फुले आंबेडकरवादी विचारवंत रमेश राक्षे (पुणे)यांनी व्यक्त केले.
फुले-आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते,परिवर्तनवादी साहित्यिक, सेवानिवृत अभियंता.मा.धो.खिलारे यांचे नुकतेच निधन झाले.त्यांना आँनलाईन मिट अँपवरुन श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.त्याप्रसंगी रमेश राक्षे बोलत होते.
पुढे ते म्हणाले, लहुजी वस्ताद साळवे यांचे ब्राम्हणीकरण आर.एस.एस.च्या माध्यमातुन सुरु असुन समाजातिल युवकांना हिंदुत्वाच्या दिशेने नेणे व त्यांच्याच द्वेष निर्माण करणे आज मोठ्या पध्दतीने सुरु आहे.त्यासाठी सर्व परिवर्तन वादी संघटनेतील कार्यकर्त्यानी एकत्र आले पाहीजे.
फकिरा दलाचे राज्याध्यक्ष सतिश कसबे (उस्मानाबाद) म्हणाले की खिलारे साहेबांचा माझा फार जुना संबंध सुरुवातीला कांशीराम सोबत व नंतर काही काळ विजय मानकर सोबत आम्ही काम केले.मा.धो.खिलारे यांनी कुटूंबासोबत २००४साली नागपुर येथे बौद्ध धम्माची दिक्षा घेतली होती. त्यांचे स्पष्ट बोलणे व कृतीने त्यांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले पण ते डगमगले नाहित.त्यांचे कुटुंबाला सर्वतो मदत समाजाने केली पाहीजे मी खंबीर पणे पाठीमागे उभारणार आहे.व मला शक्य होईल ती मदत करणार आहे असे त्यांनी आश्वासन दिले.यावेळी जयंत लोखंडे यांनी श्रध्दाजंली अर्पण करताना खिलारे साहेबांसोबतचे अनुभव व्यक्त केले.त्यांच्या निधनाने आपली वैयक्तिक हानी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दलित युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष जोशिलाताई लोमटे(तेर) यांना श्रध्दाजंली अर्पण करताना आपले रडू आवरता आले नाही.खिलारे साहेबांना तिन मुली त्यांनी मला चौथी मुलगी मानली होती.अंत्यत हळवे मनमिळाऊ व्यक्तीमत्व असणारे खिलारे साहेब अत्यंत तळमळीने विचार व्यक्त करीत .त्यांचे विषयी बोलताना शब्द अपुरे पडतात.मन हेलावुन जाते.त्यांचे अधुरे कार्य पुर्ण करणे हिच त्यांना खरी श्रध्दाजंली असेल.
जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे(पंढरपुर) म्हणाले की,मा.धो.खिलारे साहेबांचा परिचय सोशल मिडीया द्वारे झाला.नंतर पंढरपुर येथे मातंग समाज प्रबोधन शिबिरासाठी ते आले होते.तेव्हां त्यांची भेट झाली. शिबीरात केलेले मार्गदर्शन युवकासाठी प्रेरणादायक होते.महापुरुषाविषयी त्यांनी लिहलेले वैचारिक लेख सा.जोशाबा टाईम्स मधुन प्रकाशित करण्यात आले.चळवळीचे वृतपत्र चालले पाहिजे हि त्यांची तळमळ होती.ते तनमनधनाने सहकार्य करीत होते.शेवट पर्यंत ते संपर्कात होते.त्यांचे परिवारातील तिन व्यक्ति दोन महिन्यात गेल्याने त्यांचे परिवारावर अक्षरशाः दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.मा.धो.खिलारे यांची कन्या माधवी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की,माझे वडील किती महान होते हे आपणा सर्वाच्या मनोगतातुन समजले.त्यांनी आम्हा तिन्ही बहिणीला मुलासारखे वाढविले.प्रकृती चिंताजनक असतानाही त्यांनी लिहलेली पुस्तकें प्रकाशित होण्याची राहुन जातात काय की अशी ते खंत व्यक्त करीत ब्लँक फंगल इन्फेक्शन मुळे डावा डोळा काढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी त्यांनी डाँक्टरला सांगीतले.माझे वाचन बंद होईल शक्यतो डोळा वाचवता आला तर बघा.पण मेंदुपर्यत इन्फेक्शन जाऊ नये यासाठी डोळा काढण्यात आला.रेमडीसिवर इंजेक्शनचे साईड ईफेक्टने फुफ्फुस निकामे झाल्याने डाँक्टरांचे प्रयत्नाना यश आले नाही.जरी ते देहाने गेले असले तरी विचाराने आपले आसपासच आहेत.त्यामुळे ते गेले असे आम्ही समजतच नाहीं.व आपण हि समजू नये.अशा भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी सचिन बगाडे(संस्थापक,दलित युवक आघाडी, पुणे) टी.एस.क्षिरसागर,मिनल खिलारे, दिलीप बेद्रे, माणिक शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.याप्रसंगी मा.धो.खिलारे यांच्या पत्नी शांताबाई खिलारे कन्या मनिषा ,सोनबा वाघमारे (पंढरपुर),रमाकांत साठे(कोल्हापुर) यांचेसह अनेक जन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन डाँ..सोमनाथ कदम यांनी केले.