एल अँड टी कंपनीच्या बेजबाबदार कामकाजामुळे म्होप्रे गावात मातंग वस्तीत घुसले पाणी…जनजीवन झाले विस्कळीत
पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी घटनास्थळी विचारला कंपनीला जाब
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल……श्रीकांत कसबे
कराड दि.:- गुरूवार कराड तालुक्यातील मोपरे गावी रस्त्यालगत असलेल्या मातंग वस्तीत एल अँड टी कंपनीच्या चुकीमुळे पावसाचे पाणी घरामध्ये आणि जनावरांच्या गोठ्यातही साठल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
बांधकाम क्षेत्रात काम करत असलेल्या एल अँड टी कंपनीने गटारीतील पाणी वाहून जाण्यासाठी योग्य ती उपाययोजना न केल्यामुळे ते पाणी तसंच तुंबून राहून मातंग समाजातील घरात आणि जनावरांच्या गोठ्यात पाणी असल्याचा आरोप पुरोगामी संघर्ष परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष किशोर साठे यांनी केला आहे.
आज मोपरे येथील नागरिकानी किशोर साठे यांच्याशी संपर्क केला असता ते ताबडतोब घटनास्थळी पोहोचले व नागरिकांच्या कडून समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. तालुका प्रशासनाने सदर कंपनीस जबाबदार धरुन योग्य ती उपाययोजना नाही केली तर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .
म्होप्रे तालुका कराड येथील l&t कंपनी च्या कामामुळे घरात व जनावरांच्या गोठ्यात शिरलेल्या पाण्याची पहाणी करताना जिल्हाध्यक्ष किशोर साठे व नागरिक.