युटोपियनचे शुगर्स चे गळीत हंगाम २०२१-२०२२ करीता ७ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
मंगळवेढा प्रतिनिधी:- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.हा कारखाना गळीत हंगाम २०२१-२०२२ ची संपूर्ण तयारी करीत असून या पूर्वतयारीचाच एक भाग म्हणुन आज दि.१५/०६/२०२१ रोजी मिल रोलर चे पूजन होत आहे. मागील सात वर्षाच्या ऊस उत्पादकांच्या विश्वासावरच व कामगार वर्गाच्या श्रमावर युटोपियन शुगर्स लि.हा येणार्या हंगामात ७ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा आशावाद कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्ता केला.
सदर मिल रोलर पूजन कार्यक्रम प्रसंगी आयोजित पूजा युटोपियन शुगर्स चे जनरल मॅनेजर (टेक्निकल) मा. तुकाराम देवकते यांच्या शुभहस्ते पार पडली. या वेळी वाहन मालक व ऊस उत्पादक प्रतींनिधी म्हणून भारत लुगडे पाटखळ,तसेच कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,अधिकारी,व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर योग्य तो खबरदारी घेत मिल रोलर पूजन चा व वाहतूक कराराचा शुभारंभ कार्यक्रम साधेपणाने करण्यात आला.
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, चालू वर्षी ऊसगाळपाचे उद्दिष्ट निश्चित पणाने पूर्ण करेल. आज पासून आपण वाहतूक कराराचा ही शुभारंभ करतो आहोत. कारखान्याच्या वतीने २३० मोठी वाहने व १०० छोटे ट्रॅक्टर चे करार आपण करणार आहोत. आज प्रातिनीधिक स्वरुपात ५ वाहनांचे करार करून शुभारंभ करण्यात येत आहे. उर्वरित करार हे २६ जून पर्यंत गटानुसार करण्यात येणार आहेत.
युटोपियन च्या प्रगती मध्ये ही कामगार वर्गाचे योगदान मोठे आहे. कोरोंना सारख्या जागतिक महामारी मध्ये ही कामगारांनी कारखान्यासाठी आपले मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदाना करीता त्यांना विशेष भत्ता म्हणून प्रोत्साहनात्मक रक्कम कारखाना प्रशासना मार्फत लवकरच कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती ही परिचारक यांनी दिली. तसेच येणार्या गाळप हंगामा करीता सर्व कामगार बंधूंना शुभेच्छा ही दिल्या.