करकंब मध्ये गुरुवारी ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’ चे उदघाटन डॉ. स्नेहा रोंगे यांची माहिती
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर- करकंब (ता.पंढरपूर) येथे येत्या गुरुवार दि.१७ जून २०२१ रोजी दुपारी ०२.०० वाजता मुंबईच्या केइएम मधून एमबीबीएस, दिल्ली च्या एमएएमसी मधून एमडी तर पॉंडीचेरीच्या जेआयपीएमइआर मधून डीएम कार्डिओलॉजी असे उच्च शिक्षण घेतलेले आणि सध्या सोलापूर येथील गंगामाई रुग्णालयात वैद्यकीय सेवा बजावत असलेले डॉ. प्रमोद निवृत्ती पवार यांच्या हस्ते ‘डॉ. बी.पी. रोंगे क्लिनिक’चे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती या क्लिनिकच्या प्रमुख व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे यांनी दिली.
पुण्याच्या प्रसिद्ध दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अनुभव घेतल्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा देण्याच्या हेतूने डॉ.स्नेहा रोंगे यांनी करकंबमध्ये महावितरण कार्यालयासमोर, पंढरपूर – करकंब रोड लगत ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’ सुरु केले असून येत्या गुरुवारपासून ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे. डॉ. स्नेहा रोंगे या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ञ असून ‘आपलं आरोग्य व आपला विश्वास’ या धर्तीवर करकंबकरांच्या मागणीनुसार येत्या गुरुवार पासून करकंबमध्ये सेवा देण्यासाठी हा दवाखाना सज्ज असणार आहे. डॉ. स्नेहा रोंगे ह्या स्वतः एमबीबीएस, एमएस (ओबीजीवाय)असून त्यांनी पुणे येथे शिक्षण घेतले आहे. करकंबमध्ये प्रथमच लॅप्रोस्कोपी एक्सपर्ट व इन्फर्टीलिटी स्पेशालिस्ट असणाऱ्या डॉ.स्नेहा रोंगे यांची सेवा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागामध्ये सहसा कोणताही आजार झाला तर त्या रुग्णांना मोठमोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागते आणि वेळेअभावी योग्य उपचार घेण्याची संधी मिळत नाही, त्यामुळे रुग्णाची प्रचंड धावपळ होते. हे लक्षात घेऊन करकंब मध्येच ‘डॉ.बी.पी.रोंगे क्लिनिक’ ची स्थापना करण्यात आली आहे. महिन्याच्या प्रत्येक सोमवारी व प्रत्येक गुरुवारी डॉ. स्नेहा रोंगे ह्या सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत क्लिनिकमध्ये सेवा देणार आहेत. विशेष करून महिलांच्या प्रसूतीसाठी या क्लिनिक मध्ये प्राथमिक स्वरूपात उपचार केले जाणार असून पंढरपूरमध्ये नवी पेठमधील बोहरी हॉस्पिटलमध्ये मंगळवार ते शनिवार सकाळी ११ ते २ व सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ.स्नेहा रोंगे ह्या रुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध असणार आहेत. बोहरी हॉस्पिटलमध्ये सध्या विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यात नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन डिलिव्हरी, जोखमीची गर्भावस्था, वेदनारहित डिलिव्हरी, गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन (टाक्याचे/ दुर्बिणीद्वारे), गर्भाशय काढण्याचे ऑपरेशन, कॉपर-टी, गर्भपात, गर्भधारणेसाठी समुपदेशन, गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन, नळीचे बंधन टाक्याचे/ दुर्बिणीद्वारे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज उपचार, लसीकरण, विवाहपूर्व समुपदेशन अशा सुविधा उपलब्ध आहेत. तसेच विशेष सुविधामध्ये दुर्बिणीद्वारे तपासणी व उपचार, गर्भाशयाच्या आतील भाग पाहण्याची दुर्बिण, स्त्रियांमधील मुत्रशास्त्र, कॅन्सरचं निराकरण करण्यासाठी चाचणी, वंध्यत्व आणि उपचार, रजोनिवृत्ती, समुपदेशन आदी विशेष सुविधा क्लिनिक मध्ये उपलब्ध आहेत. करकंबसारख्या ग्रामीण भागात केवळ उपचाराअभावी रुग्णांचे नुकसान झाले असून आता ‘डॉ.बी.पी. रोंगे क्लिनिक’ च्या माध्यमातून स्त्री रुग्णांवर प्राथमिक उपचाराची सोय झाल्यामुळे करकंब भागात समाधानाचे वातावरण पसरले आहे.