Uncategorized

दुष्काळाचा कलंक पुसायचा असेल तर मनसेला निवडून द्या….दिलीपबापू धोत्रे 

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर ( प्रतिनिधी….

      मंगळवेढा तालुक्याला लागलेला कलंक म्हणजे या ठिकाणी कायमचा असलेला दुष्काळ हा दुष्काळ जर संपवायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जनतेनी निवडून द्यायला हवे. असे मनसेचे उमेदवार दिलिप बापू धोत्रे यांनीआज पत्रकार परिषदेत सांगितले.
     आज पर्यंत झालेल्या कित्येक विधानसभा च्या निवडणूक मध्ये या आजी माजी आमदारानी मंगळवेढा तालुक्यातील जनतेला पाण्याचे गाजर दाखवण्याचे काम केले आहे. बेरोजगार युवकांना हाताला काम मिळावे म्हणून एम. आय. डी. सी. आवश्यक असताना या बाबतीत येथील नेत्यांनी राजकारण केले गेले. मनसे चे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही पंढरपूर येथे एम. आय. डी. सी. ची मंजूरी दोन वर्षापूर्वी आम्ही आणली. परंतु येथील नेत्यांनी याला खो घालण्याचे काम करण्यात आले. आता आम्ही एम. आय. डी. सी. आणली म्हणून ते निवडणूक च्या प्रचारात सांगत आहेत. अशा संधीसाधू विरोधकाला घरी बसवले पाहिजे.
     मंगळवेढा तालुक्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे या भागातील मुले शैक्षणिक गुणवत्ता व उच्च शिक्षणासाठी अन्यत्र जात आहे. या मंगळवेढा तालुक्यात उच्च शिक्षणाची सोय मनसेच्या माध्यमातून केली जाणार आहे. युवकांना आय. टी. पार्क ची सोय, उद्योग धंदे, कारखाने इ. युवकाच्या हाताला काम देणारे ऊद्योग मनसे च्या वतीने उभे केले जाणार आहे.
    महिलांना घरात बसून गृह उद्योग साठी मदत व सोय करणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील जनता महिला, युवक, ज्येष्ट नागरिक यांचा पाठींबा आमच्या पाठीशी आहे.
या निवडणूक मध्ये विजय आमचाच होणार आहे. मनसे या पक्षाला मतदार दिलसे मतदान करणार आहे.
    अशी माहिती मनसे चे उमेदवार दिलिप बापू धोत्रे यानी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close