सुनील अडगळे यांच्या साहित्यकृतीचे प्रकाशन.


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-गुरु शिष्याची-महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून लेखक सुनील अडगळे यांच्या “वेदनेतून सुखाकडे“-कवितासंग्रह,
“चला वक्तृत्व स्पर्धा जिंकू या”-भाषणसंग्रह आणि
“मुक्त विचार” -लेखसंग्रह या
तिन्हीही पुस्तकांचे प्रकाशन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकांचे स्वागत करताना अभिजित पाटील यांनी सुनील अडगळे यांच्या साहित्यिक दमदार वाटचालीला शुभेच्छा देताना ‘साहित्य हा समाजाचा आरसा असतो, समाज परीवर्तन करण्याची फार मोठी ताकद साहित्यात असते,जो पुस्तक वाचतो त्यांचे मस्तक घडते,असे स्वाभिमानी मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही’ असे मत व्यक्त केले.यावेळी मंचावर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूरचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, समाजप्रबोधनकार राणीताई सिद्धवाडकर, मारुतीभाऊ कोरके,संजयभाऊ तळेकर,भारतबापू कोरके,अनिल बोराडे,भागवत पांढरे,भास्कर तळेकर, हरिश्चंद्र तळेकर, आदिनाथ जरांगे पाटील,नितीन खटके,प्रा. तुकाराम मस्के, प्रा. महादेव तळेकर, महेश खटके, डॉ.औदुंबर तळेकर,संजय कोरके, आप्पासाहेब थिटे, शहाजहान शेख,मुंबई हायकोर्टाचे वकील संदीप साळुंखे, आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार सुनील उंबरे, उद्योगपती आयुब पटेल, मुक्ताई अनाथ व मतिमंद मुलांची शाळा लवंगीचे दयानंद पवार सर आणि ड्रॅगन फ्रुट शेतकरी किसन कानगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली बोराडे आदी मान्यवर आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजर्षी प्रतिष्ठानचे अजय जाधव,युवराज सरडे,रामदास माळी, डॉ.सुनील गावंधरे, बाळासाहेब थिटे,धनंजय तळेकर ,सचिन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.महादेव तळेकर,स्वागत दादासाहेब तळेकर आणि सूत्रसंचालन समाधान खारे यांनी केले.




