गौतम विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सहात साजरी!
रिपब्लिकन सेने च्या वतीने गणवेश वाटप...

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-पीपल्स् एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित (संस्थापक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर) व चेअरमन आनंदराज आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना )यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या गौतम विद्यालय, पंढरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्सहाने साजरी करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन सेनेच्या वतीने विध्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. रिपब्लिकन सेना ही सामाजिक संघटना असून लोकवर्गणीतून व सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तीच्याच्या सौजन्याने चांगले उपक्रम राबवित असते. यावेळी प्रमुख पाहुणे विश्वजीत घोडके साहेब पंढरपूर शहर पोलिस निरिक्षक, सागर शामराव गायकवाड प. म.अध्यक्ष रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य, सुनिल वाघमारे अध्यक्ष फुले शाहु आंबेडकर विचार मंच, नगरसेवक संजय बंदपटटे,संतोष सर्वगोड चेअरमन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक नंदकुमार वाघमारे सर हॆ होते.
मान्यवारांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सागर गायकवाड व मित्र मंडळ यांचे हस्ते विद्यार्थी विद्यार्थ्यांनींना शालेय गणवेश वाटप करण्यात आला. तसेच खाऊ वाटप करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत रुपनर सर यांनी केले तर आभार डी.टी. सावंत सर यांनी मानले.