Uncategorized

फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे वतीने  दि.11/12  एप्रिल रोजी व्याख्यान मालेचे आयोजन

संविधानाचा अमृत महोत्सव व राष्ट्रपिता महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-संविधानाचा अमृत महोत्सव व राष्ट्रपिता महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे वतीने  कै.. बाबुराव विष्णू माने सभागृह (योगभवन), एल.आय.सी. ऑफीस पाठीमागे, पंढरपूर   येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. ११/०४/२०२५ रोजी सायं. ६ वा. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९८ व्या जयंती निमित्त वैचारीक व्याख्यानाचे आयोजन केले असून व्याख्याते प्रा. डॉ. एम. डी. शिंदे (सोलापूर) हॆ विषय : महात्मा ज्योतिबा फुले यांची क्रांतीकारी चळवळ व सद्यस्थिती! याविषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

तर शनिवार दि. १२/०४/२०२५ रोजी सायं. ६ वा. राष्ट्रनिर्मात बोधिसत्व डॉ. बाबासहेब आंबेडकर यांचे १३४ व्या जयंती निमित्त वैचारीक व्याखानाचे आयोजन केले आहे.

व्याख्याते राहुल पद्मिनी नवनाथराजे (सिनेअभिनेते पुणे ) हॆ  भारतीय संविधान व सद्यस्थिती! या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत…

दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल वाघमारे अध्यक्ष, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच हॆ असणार आहेत.

तरी या वैचारीक व्याखानमालेसाठी आपण उपस्थित रहावे, ही विनंती फुले-शाहू आंबेडकर विचारमंच सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, पंढरपूर यांनी केले आहे

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close