वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक माने यांनी केले मतदारांना आवाहन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-२५२ पंढरपूर विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडी चोअधिकृत उमेदवार म्हणून अशोक रंगनाथ माने रा. ढवळस . ता.मंगळवेढा. हॆ सन-१९९८-१९९९ पासून भारिप बहुजन महासंघाचा कार्यकर्ता म्हणुन कार्यरत 2006-2014 पर्यंत भारिप तालुकाध्यक्ष 2022 पासून वचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष ढवळस गावातून सामाजिक कार्यास सुरुवात
1991 पासून गायरान जमिनीचे गावठाण करुन घरकुल बांधून उपेक्षित वंचिताना न्याय दिला.आत्तापर्यंत मंगळवेढा तालुक्यात 1000घरकुल लाभार्थ्यांनामिळवून दिली.
विध्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती साठी सातत्याने प्रयत्न करुन एकाचवेळी 3 वर्षा पर्यत पेंडिंग स्कालरशिप 125 विध्यार्थ्यांना मिळवून दिली.
अनेक अंदोलन विविध विषयावर करून न्याय व शासन दरबारी म्हणणे देऊन विविध विषयांचा उलगडा केला.
विविध विकास कामासाठी शाखा अध्यक्षांच्या प्रत्येकाच्चा गावात पाठपुरावा करुन विकासकामे मार्गी लावली.अनेक रुग्णांना वेळोवळी शासकिय योजनांचा लाभ मिळवून दिला.
ढवळस जि. प. प्रा. शांळेमध्ये ढवळचे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष पद भूषविले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक ढवळसळा मिळवून दिला. 50,000/-चा पुरस्कार
वंचित बहुजन आघाडीचे अशोक माने हॆ क्रियाशील सदस्य असून बाळासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून 2024साठी त्यांना पक्षाने उमेदवारी दिली असून सिलेंडर चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना मतदान करुन विजयी करावे असे त्यांनी आवाहन केले आहे.