पंढरपूर अर्बन बॅक बचाव समविचारी आघाडी निवडणूक मैदानात
आमचा विजय निश्चितच होणार--दिलीप धोत्रे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर:-सत्ताधारी परिचारक आघाडी विरोधात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर अर्बन बॅक बचाव समविचारी आघाडीतर्फे 17 जागेसाठी 17 जणांचे उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आले. उमेदवार पुढील प्रमाणे
सर्व साधारण -सुभाषराव भोसले,प्रशांत गिड्डे ,,श्रीकांत शिंदे,हरिदास शिरगीरे,मंदार बडवे,महेश उत्पात,एकनाथ सुर्वे,बजरंग थिटे,हनुमंत बाबर,राजकुमार जाधव, प्रकाश पवार, रमेश थिटे,जनाबाई अवघडे,
महिला सर्व साधारण -छायाताई खंडागळे,सौ.रत्नमाला पुणेकर
अनुसूचित जाती-महादेव भालेराव
विमुक्त जाती-मधुकर चव्हाण
इतर मागासवर्गीय -अशोक बंदपट्टे
सत्ताधारी गटाकडून हि निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अयशश्वी झाला आहे.सत्तेचा गैरवापर करुन आमचे उमेदवाराचे अर्ज बाद करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यांनी ते थांबवावेत व निवडणुकीला सामोरे यावे असे आवाहन मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केले. अर्बन बँकेचे सभासद परिचारक यांचे कारभारावर नाराज असून आमची आघाडी निश्चित विजयी होणार आहे असा विश्वास व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष सुभाषराव भोसले म्हणाले की,कवठेकरांची बॅक ही सभासदांची बॅक राहिली नाही.हुकूमशाही पध्दतीने कारभार सुरू असुन सर्व संचालक मंडळ हे दबावात असतात. निवडणूक प्रचार सभेत आपण सविस्तर कारभाराविषयी व आम्ही बॅक कशी चालवून दाखऊ याबाबत बोलणार आहेच असे स्पष्ट केले.
यावेळी माजी नगरसेवक सुधीर धोत्रे,अरूणभाऊ कोळी,लखन चौगुले,शशिकांत पाटील, संजय बंदपट्टे,संतोष कवडे आदी उपस्थित होते.
आज परिचारक गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रशांत परिचारक, रजनीश कवठेकर, हरीश ताठे, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, पांडुरंग घंटी, राजाराम परिचारक, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंगण, अनंत कटप, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार, मनोज सुरवसे, गजेंद्र माने, अनिल अभंगराव, माधुरी जोशी, संगीता पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.