Uncategorized
विजयी उमेदवारां बरोबर पराभूत उमेदवारांचा ही केला शिवसेना तालुकाप्रमुखांनी सन्मान

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या व पराभूत झालेल्या उमेदवारांचा नुकताच त्यांच्या गावात जाऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे .गुरसाळे जि प गट विभागप्रमुख उमेशबापू काळे. विभागप्रमुख बाळासाहेब पवार समाधान व्यवहारे आदींनी त्यांचा सन्मान केला.
तालुक्यातील खरातवाडी येथील विजयी उमेदवार व सरपंच आदींचा या वेळी सन्मान करण्यात आला तसेच होळे येथील पराभूत व विजयी उमेदवारांचाही सन्मान करण्यात आला या वेळी बहुसंख्य ग्रामस्थ तसेच महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते