Uncategorized

डॉ. मदन क्षीरसागर समाज गौरव पुरस्काराने सन्मानित

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:-दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर यांना सोनार समाजाच्या वतीने दिला जाणाऱ्या समाज सेवा गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने समाज भान ठेवून सोनार समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन सोलापूर जिल्हा पांचाळ सोनार समाजाच्या वतीने यावर्षीचा समाज गौरव पुरस्कार डॉ.क्षीरसागर यांना संघटनेचे अध्यक्ष वसंत पोतदार यांचे हस्ते देण्यात आला.डॉ. क्षीरसागर हे पंढरपूर येथील सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांचे वैद्यकीय क्षेत्रा बरोबरच सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रामध्येही मोठे योगदान आहे त्यांच्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ सचिव ॲड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक आप्पा चोपडे,दिलीप आप्पा घाडगे,अनिरुद्ध सालविठ्ठल व सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर प्राचार्य राजेंद्र पाराध्ये ,उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे, पर्यवेक्षक सुनील पाटील, ज्युनिअर विभाग प्रमुख उत्तरेश्वर मुंढे, राजूभाई मुलाणी, शिवाजी येडवे,मुख्य लिपिक हनुमंत मोरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close