Uncategorized

स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे मुंढेवाडीमध्ये उदघाटन

छायाचित्र- कालावधीत मुंढेवाडी (ता. पंढरपूर) मध्ये ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन करताना श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुदाम बापू मोरे सोबत माजी सरपंच सिद्धेश्वर लक्ष्मण मोरे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण मोरे, पोलीस पाटील शरद मोरे, तंटामुक्त अध्यक्ष सचिन रामचंद्र मोरे, हणमंत घाडगे, तलाठी मुसाक काझी स्वेरीचे डॉ. श्रीकृष्ण भोसले, प्रा. रविकांत साठे, प्रा.जी.जी.फलमारी, प्रा. व्ही.व्ही. झांबरे, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. एस.बी.खडके, प्रा. नितिन मोरे, प्रा. व्ही.व्ही गोरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती, प्रा. यशपाल खेडकर व विद्यार्थी.

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.२७ डिसेंबर पासून ते २ जानेवारी २०२३ या कालावधीत मुंढेवाडी (ता. पंढरपूर) मध्ये ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे आयोजन केले असून आज ‘युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या उपक्रमाचे उदघाटन श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुदाम बापू मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती यांच्या नेतृत्वाखाली अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण १५० विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या शिबिरात सहभाग घेतला असून आठवडाभर विविध उपक्रम होणार आहेत. या शिबिरामध्ये श्रमदान, चित्रकला, निबंध स्पर्धा, वृक्ष लागवड, मतदार जनजागृती, पर्यावरणाचा विकास, महिला आरोग्य विषयक समस्या, शिक्षण, स्वच्छता अभियान आदी विषयांवर प्रबोधन व मार्गदर्शन होणार आहे. यामध्ये तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी बोलताना संचालक सुदाम मोरे म्हणाले की ‘विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी हा परिपूर्ण घडत असतो. हे संस्कार विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये अत्यंत उपयोगी पडणार आहेत. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.महेश मठपती बोलताना म्हणाले की, ‘पुढील सात दिवस विद्यार्थी गावामध्ये स्वच्छता, श्रमदान या बरोबरच बालविवाह निर्मूलन, मतदार जनजागृती, जल व्यवस्थापन, पर्यावरण जनजागृती, कचरा व्यवस्थापन यावर देखील कार्य करणार आहेत. यावेळी उदघाटन प्रसंगी मुंढेवाडीचे माजी सरपंच सिद्धेश्वर लक्ष्मण मोरे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण मोरे, पोलीस पाटील शरद मोरे, तंटामुक्त अध्यक्ष सचिन रामचंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य हणमंत घाडगे, तलाठी मुसाक काझी यांच्यासह मुंढेवाडीतील ग्रामस्थ तसेच स्वेरी अभियांत्रिकीचे डॉ. श्रीकृष्ण भोसले, प्रा. रविकांत साठे, प्रा.जी. जी. फलमारी, प्रा. व्ही.व्ही. झांबरे, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. एस.बी.खडके, प्रा. नितिन मोरे, प्रा. व्ही.व्ही गोरे व इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close