मागासवर्गीय समाजावरचे अन्याय सहन करणार नाही—सौ. पुनम फाळके
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
तासगांव:- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून राज्यामध्ये राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांच्या मार्गदर्शनाने समाजाला न्याय देत असताना मागासवर्गीय समाजावर होत असलेले अन्याय कदापि सहन करणार नसल्याचे मत पुरोगामी संघर्ष परिषदेच्या सांगली (ग्रामीण) जिल्हाध्यक्षा सौ. पूनम फाळके यांनी व्यक्त केले त्या तासगाव येथे पोलीस स्टेशन समोर मनेराजुरी येथील चर्मकार समाजाच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.
पुढे बोलताना सौ फाळके म्हणाल्या, वास्तव परिस्थिती बघून अन्याय करणारावर गुन्हा हा दाखल होणारच परंतु तोड पाण्यासाठी कुठेही खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याचीही आम्ही दखल घेत असताना खऱ्या गुन्हेगाराला कदापि सोडणार नाही.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य सल्लागार कमिटीचे सदस्य प्रकाश फाळके, वर्षा वाघमारे, सुरेश वाघमारे इत्यादी उपस्थित होते.