पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे “संविधान दिन” साजरा
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर (दि.26):- पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरण व अधिवक्ता संघ पंढरपूर यांच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश एम.बी. लंबे, न्यायाधीश ए.ए.खंडाळे, न्यायाधीश एस.ए. सांळुखे, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.भगवान मुळे, उपाध्यक्ष श्री.नाईकनवरे, विधी स्वयंसेवक श्री यारगट्टीकर तसेच न्यायालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर डॉ. श्री. शब्बीर अहमद औटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव नरेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा न्यायाधीश लंबे म्हणाले, संविधान आहे म्हणूनच प्रत्येक नागरिकांचे हक्क व कर्तव्य अबाधित आहेत. प्रत्येक नागरिकांनी हक्क व अधिकाराबाबत जागरुक असताना आपल्या कर्तव्य पालनाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. संविधानामध्ये जे आपल्या हक्क व कर्तव्य दिले आहेत . त्या सगळयाचा आत्मा उद्देशिका आहे. जेव्हा आपल्यावर काही प्रसंग येतो. त्यावेळी आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपण न्यायालयात जातो. न्याय देतान सर्वच न्यायालय संविधान समोर ठेवून आपल्या प्रत्येक हक्काबाबत न्यायालय निर्णय घेत असते असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी न्यायाधीश ए.ए.खंडाळे, न्यायाधीश एस.ए. सांळुखे यांनी संविधान दिना निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी संविधानाच्या उद्देशिकेच वाचन करण्यात आले.
0000000000