पुरोगामी संघर्ष परिषदेची 2018 च्या अध्यादेशानुसार गायरानातील अतिक्रमने नियमानुकुल करण्याची मागणी
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने चिखली येथील गायरानातील अतिक्रमणे 2018 च्या अध्यादेशाने नियमानुकुल करावीत अशी निवेदनाद्वारे मागणी करताना शंकर आंबवडे व इतर
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
संपादक श्रीकांत कसबे
चिखली(ता.कडेगाव जि.सांगली) :-पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण शासन परिपत्रक क्र.प्रआयो-२०१८/प्र.क्र २५६/यो-१० दि.२०-८-२०१८ व शासनाचे सम क्रमांक दि.०५-११-२०१८ चे पत्रानुसार संगणकीय प्रणाली द्वारे नियमानुकूलकरणे गरजेचे असताना सुद्धा आपण ती निसमानुकुल करण्यास विलंब लावला त्यामुळे बरेच लाभार्थी नियमानुकुलापासून दूर राहिले परंतु सदर अध्यादेशाचा आधार घेऊन ताबडतोब नियमानुकुलाची प्रक्रिया चालू करावी अशा आशयाचे निवेदन पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने शंकर आंबवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चिखलीच्या (ता.कडेगाव) ग्रामसेविका सौ.ठाकरे याना देण्यात आले.
सदर शिष्टमंडळात अमोल आंबवडे, रवी मोहिते, सुभाष मोहिते,भारत केंगार, विकास गायकवाड, विकास जाधव ,भीमराव आंबवडे,विशाल केंगार ,भगवान आंबवडे, साहेबराव आंबवडे, कल्पेश आंबवडे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.