पंढरपूरकर म्हणजे कोण हो ? अमरजीत पाटील यांचा सवाल
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-काॅरिडाॅर विरोधी आंदोलनाचे वार्ताकन करताना पंढरपूरातील काही पत्रकार पंढरपूरकरांचा असा उल्लेख करुन, “पंढरपूरकरांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा””पंढरपूरकरांचा काॅरिडाॅरला तिव्र विरोध”* अशा स्वरुपाच्या बातम्या देत आहेत.
या निमित्ताने तमाम पत्रकारांना सांगू इच्छितो.श्री विठ्ठल मंदिराकडिल आंदोलन करणारे नागरिक म्हणजेच पंढरपूरकर असा कदाचित आपला समज झालेला आहे.तो दुरुस्त करावा.संभाव्य काॅरिडाॅरच्या बाहेर पण पंढरपूरकरच राहतात ! ते काय पाकिस्तानाचे अथवा बांगलादेशाचे नागरिक नाहीत.असे आवहान अमरजित पाटील तालुकाध्यक्ष,पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी.संस्थापक,कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठान,पंढरपूर.यांनी पत्रकाद्वारे केले आहे. काय आहे ? आम्ही म्हणजेच सगळे आले असा कधी ही कुठल्या ही गोष्टीचा अर्थ नसतो.त्यामुळे बातम्या देताना पंढरपूरकरांचा म्हणण्यापेक्षा बाधित होणार्या नागरिकांचा विरोध असे लिहावे.तसे ही सगळ्या गावात रस्ता रुंदीकरण होत असताना,सगळे गाव पाडत असताना पत्रकारांच्या भाषेतील सो काॅल्ड पंढरपूरकर कुठे काशी (यात्रा) करायला गेले होते ? बाकी पत्रकारांना सांगण्याएवढे आम्ही नक्कीच मोठे नाहीत.चुकभुल देणे घेणे..असे ही पत्रकात म्हटले आहे.