समाजातील उच्चशिक्षीत बुध्दीजिवींनी संविधान समजून घ्यावे…..—सचिन मोटे ,(आयकर उपायुक्त, भारत सरकार)
, फुले,शाहु, आंबेडकर विचारमंच आटपाडी व्याख्यानमाला पुष्प ७वे
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
आटपाडी– दि. 26/11/2022
बहुजन समाजातील उच्चशिक्षीत बुध्दीजिवी वर्ग आजही संविधानिक ज्ञानापासून अनेक कोस दुर आहे. आपल्या दैनंदिन जिवन व्यवहारामध्ये तो अधिकच गुरफटत चालला आहे. अशावेळी उच्चशिक्षीत बुध्दीजिवींना संविधानिक आत्मभान न आल्यामुळे आज भारताचे संविधान एकांकी होत चाललेले आहे. जर हेच उच्चशिक्षीत बुध्दीजिवी देशाच्या राज्यघटनेला समजून घेवू लागले तर संविधान राबविणारे आपले प्रतिनीधी सुध्दा त्यांच्याकडून उच्चशिक्षीत व समाजाचे आत्मभान असणारे निवडून जातील. आणि भारतीय राज्यघटनेचे योग्य संवर्धन होईल. असे विचार आयकर उपायुक्त भारत सरकारचे सचिन मोटे यांनी व्याख्यानमालेचे 7 वे पुष्प गुंफताना मांडले.
ते फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत “ भारतीय संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी हीच खरी सार्वभौम राष्ट्रवादाची निर्मिती ” या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एस.सी बोर्ड, पुणे. येथील कक्ष अधिकारी मा. राजेश जावीर हे होते. त्यापुढे सचिन मोटे म्हणाले की, समाजातील जातीव्यवस्था आरक्षणवाद, व इतर क्षेत्रातील विषमता यावर ठोस असा निर्णय भारत सरकारने संविधानाला केंद्रवर्ती मानून घेणे आवश्यक आहे. तसेच यापुढील या संविधानाच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आटपाडी तालुक्यातील सर्व डॉक्टर , इंजिनियर्स वकील यांनी याकार्यक्रमास सहकार्य करणे व प्रत्यक्ष इथे उपस्थित राहून या व्याख्यानाचा लाभ घेणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षीय भाषणामध्ये फुले , शाहु, आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष मा.राजेंद्र खरात यांनी संविधान सप्ताह साठी ज्यांनी ज्यांनी तन , मन व धनाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
या व्याख्यानमालेच्या सातव्या दिवशी संविधान ग्रंथ दिंडीचे आडपाडी शहरात संचलन करणेत आले. यावेळी आटपाडी शहरातील हजारो नागरीक , विदयार्थी , विदयार्थीनी व शिक्षक सहभागी झाले होते.
आपल्या अध्यक्षीय भाषमणामध्ये राजेश जावीर यांनी या व्याख्यानमालेसाठी सतत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याच कार्यक्रमामध्ये फुले, शाहु, आंबेडकर विचारमंचच्या वतीने या व्याख्यानमालेच्या प्रसंगी सतत सात दिवस भिम गीतांचे गायन करणा-या नंदाताई खैरमोडे यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांचा मॉरीशस येथे मॉरीशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंह रूपम, पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ आणि भारताचे सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या “ कोरोनाकाळातील कथा ” या कथासंग्रहामध्ये त्यांची बे एक्कं बे या कथेचा समावेश असल्यामुळे त्यांचाही संविधानाची प्रत, उद्देशिका, व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करणेत आला.
आटपाडी तालुक्यातील सर्व जि.प.शाळांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या फ्रेम केलेल्या प्रती भेट देणेत आल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान ऐवळे यांनी केले. सुत्रसंचालन गणेश कबीर तर , आभार सुष्मिता सुरेश मोटे यांनी मांडले. या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मण मोटे , सुरेश मोटे , प्रा. डॉ.रामदास नाईकनवरे , प्रा.डॉ.उत्तम मोटे , संताजी देशमुख , सनी पाटील , सुनिल भिंगे , विनायक मासाळ , बिरा खांडेकर , दत्ता कांबळे , नारायण जावीर , प्रशांत चंदनशिवे , दादा कचरे, धनंजय वाघमारे , रणजीत ऐवळे , विशाल काटे , किरण सोहनी, जनार्दन मोटे , नामदेव खरात , भिमराव कदम , अक्षय बनसोडे , किरणकुमार जावीर , समाधान ऐवळेसर, विवेक सावंत , शरद वाघमारे , समाधान खरात , राजेश मोटे, विलास धांडोरे ,भिकाजी खरात , मारूती ढोबळे , सुषमाताई मोटे , कविता खरात , पुनम ऐवळे, नंदाताई खैरमोडे , राजश्री मोटे, अनुषा जावीर , जयश्री नामदेव खरात, जानता दुर्योधन खरात, प्रियांका विवेकानंद खर्चे इ. असंख्य महिलावर्ग उपस्थित होता.