वधू वर सूचक मंडळ ही सामाजिक बांधिलकी जपणारी व्यापक चळवळ व्हावी—राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कोल्हापूर:- धावपळीच्या जीवनामध्ये आणि कुटुंबाच्या आशा,अपेक्षांची उंची वाढल्यामुळे, शिक्षण घेऊन समाजाबरोबर असलेली नाळ दुरावल्यामुळे समाजातील संवाद थांबले आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत वधू वर सूचक मंडळानी व्यावसायिक न राहता व्यवहारिक होऊन वधू वर सूचक ही एक व्यापक स्वरूपाची सामाजिक काम करणारी चळवळ उभी करण्याचं काम केलं पाहिजे असे सुतोवाच उद्गार पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी काढले ते यश वधू वर सूचक(मिणचे) व पुरोगामी संघर्ष परिषदेने कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक या ठिकाणी आयोजित केलेल्या वधू वर सूचक मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक यश वधू वर सूचक मंडळाचे संस्थापक व पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजू दादा घाटगे यांनी केले.
सदर कार्यक्रमात राज्य संपर्कप्रमुख प्रा निवांत कवळे यांनी मनोगतामध्ये संघटना व वधू वर सूचक याच्यामध्ये संवाद गरजेचा असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी महासचिव मारूतीराव बोभाटे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला ,रवींद्र हंकारे, शिवाजीराव घाटगे, प्रशांत जाधव इत्यादी प्रमुख पदाधिकारी व नांदेड लातूर सोलापूर बारामती पुणे सातारा सांगली इत्यादी जिल्ह्यातून आलेले पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.