जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर(प्रतिनिधी):-महाआघाडी कडे१७०आमदार आहेत तर भाजपकडे १०५त्यामुळे ते कधीच सत्तेत येऊ शकत नाहीत. जवळच कार्यकर्ते ईतरत्र जाऊ नये म्हणून एक आमदार द्या राज्याची सत्ता बदलून दावतो असे खोटे आमिष विरोधी पक्ष नेते दाखवत आहेत.मतदार संघाचा विकास करायचा असेल तर वाढपी सत्ताधारी पक्षाचा असला तर निधी मिळतो विरोधक काय वाढणार असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.ते पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील राष्टवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,राज्यातील सरकार मजबूत आहे.कर्नाटक, मध्यप्रदेश सारखे येथे ही घडेल अशी आशा कार्यकर्त्यांना फडणवीस दाखवत आहे.आम्ही काँग्रेस सोबत यापूर्वी सरकार चालविले आहे.लोककल्याणकारी योजना देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे.राज्यातील सहकारी कारखाण्याबाबत आम्ही कधीच राजकारण केले नाही. कारण कारखाने हे शेतकऱ्यांचे असतात. अडचणीत येणारे कारखाने चालविण्याची आमच्यात हिंमत आहे.असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. विरोधक हे पक्षीय राजकारण करतात.सहा महिने झाले विधानपरिषद सदस्याची यादी दिली पण अजूनही राज्यपालांची मंजुरी मिळत नाही.
भगीरथ भालके यांना भावनिक होऊन मत मागत नाही. भारतनाना यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आम्ही मत मागत आहोत.भगीरथ नानांचा फक्त रक्ताचा वारस नाही तर विचाराचा सुध्दा वारस आहे.त्यांना आपण निवडून दिले पाहिजे असा आमचे नेते शरद पवार यांचा मी निरोप घेऊन आलो आहे.असे सांगुन भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाबत बोलताना ते म्हणाले की, ते उद्योजक आहेत.व उद्योजक हे नेहमी नफ्याचा विचार करत असतात.राज्याच्या अखत्यारीत येणाऱ्या कामाची चौकशी लावली पाहिजे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठेकेदार जरी सापडले तरी त्यांचेवर कारवाई करणार असा ईशारा यावेळी त्यांनी दिला.
यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उमेदवार भगिरथ भालके यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी पालक मंत्री दत्तात्रय भरणे,रिपाई अध्यक्ष राजेंद्र गवई,आ.शशिकांत शिंदे, आ.संजय शिंदे, आ.यशवंत माने,आ.अमोल मिटकरी,दिलीप सोपल,मनसेचे राज्य संघटक दिलीप धोत्रे,राजिव आवळे.उत्तम जानकर,उमेश पाटील, संभाजी शिंदे, युवराज पाटील, विजयसिंह देशमुख यांचेसह महाआघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कोळीसमाजाच्या वतिने उमेदवार भगिरथ भालके यांना पांठीबा देणारे पत्रक अध्यक्ष बाबा अधटराव,अरुणभाऊ कोळी,धनंजय कोताळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.