परभणी प्रकरण फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे वतीने निषेध!
रिपब्लिकन सेना, आप, मी वडार महाराष्ट्राचा यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच, पंढरपुर यांचे – वतीने परभणी येथील घटनेबाबत निषेध करण्यात येऊन तहसीलदार सुनील लंगोटे यांना निवेदन देण्यात आले.
1)दि.१०/१२/२०२४ रोजी परभणी येथील डॉ. बाबासाहेबआंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकात्मक संविधान-पत्रिकेची विटंबना करून नासधूस करणाऱ्या नराधमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा.
2)संविधान समर्थनार्थ व वरील कृत्याच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने शांततेत बद ११ /१२/२०२४ आंदोलन यशस्वी झालेनंतर जातियवाद्यानी संविधानप्रेमी आंदोलनास गालबोट लावण्यासाठी परभणीमध्ये बेकायदा जमाव जमवून दंगल करणा-यांची सखोल चौकशी व्हावी.
3)कोबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी आंबेडकरी- जनतेच्या घरामध्ये घुसून निरपराध जनतेवर खोटे गुन्हे दाखल करून, अटक करून अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर (संबंधित पोलिसांवर) सूखोल चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल करणेत यावेत,
4) कोबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी निरपराध जखमी अवस्थेतील महिला-पुरुष- युवकांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्यांची तात्काळ गुन्हे मागे घेण्यात यावे. :
5)संविधानाचे समर्थनार्थ आंदोलक, वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या दिवंगत सोमनाथ व्यंकट सुर्यवंशीयाचे- वार खोटे गुन्हे दाखल करून पोलिस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी झाला? केलेल्या मारहाणीमुळे मृत्य झोळी त्या संबंधित न्यायालयीन कोठडीत पोलिस अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.
6)संविधानविरोधी वर्तन करणाऱ्या जातीयवादी गुंडानी पोलिसांचे कोबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी होवून आंबेडकरी जनतेस अमानुष मारहाण केली त्या गांवगुंडाची चौकशी होवून ज्या पोलिसांनी जातीयवादी गुंडाना हाताशी धरून करून घेतले. त्यांची सखोल चौकशी होवून गांवगुंडावर गुन्हे दाखल करावेत.
– सदर प्रकरणाची गंभीरपणे दखल घेवून संबंधिताकार काउक कायदेशीर कारवाईव्हावी, अन्यथा महाराष्ट्रामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी!असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अध्यक्ष सुनील वाघमारे, उपाध्यक्ष ऍड. किर्तीपाल सर्वगोड, भालचंद्र कांबळे, सचिव जितेंद्र बनसोडे, खजिनदार दादासाहेब दोडके, सल्लगार आर. पी. कांबळे, श्रीकांत कसबे, सदस्य डी राज सर्वगोड, संतोष सर्वगोड, सागर गायकवाड,राजेंद्र पाराध्ये, उमेश पवार, विठ्ठल कांबळे,संजय बंडपट्टे,संजय सातपुते, ऍड. रोहित एकमल्ली लक्ष्मण रणदिवे, ऍड. गौतम भालेराव, ऍड. गौतम भालेराव, महादेव मोरे आदीच्या सह्या आहेत.
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले त्याला प्रतिसाद देऊन पंढरपूरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवले होते.रिपब्लिकन सेनेचे सागर गायकवाड यांनी त्यांचे पदाधिकारी यांनी तहसीलदार यांना दिले निवेदन
मी वडार महाराष्ट्रचा, या संघटनेच्या वतीने संजय बंडपट्टे, माजी नगरसेवक सुधीर धोत्रे, लखन चौघुले आदिनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
आम आदमी पक्षाचे वतीने एम. पाटील व त्यांचे सहकार्याने तहसीलदार यांना निवेदन दिले.