सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची सि बी आय चौकशी व्हावी व अन्य मागणीसाठी रिपाईच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- परभणी येथील भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याची सी.बी.आय मार्फत चौकशी करावी.
(३) कोबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी आंबेडकरी गुन्हे दाखल करून, अटक करून अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर (संबंधित पोलिसांवर) सखोल चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल करणेत यावेत.
(४) कोबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी निरपराध जखमी अवस्थेतील महिला-पुरुष-युवकांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्यांचे तत्काळ गुन्हे मागे घेण्यात यावे.
(५) संविधानाचे समर्थनार्थ आंदोलन, वकिलांचे शिक्षण घेणाऱ्या दिवंगत सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचेवर खोटे गुन्हे दाखल करून पोलिस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीत मृत्यु झाला. त्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा.
(६) संविधानविरोधी वर्तन करणाऱ्या जातियवादी गुडांनी पोलिसांचे कोबिंग ऑपरेशन मध्ये सहभागी होवुन आंबेडकरी जनतेस अमानुष मारहाण केली व त्या गावगुंडांची चौकशी होवून ज्या पोलिसांनी जातीयवादी गुडांना सहभागी करून घेतले त्यांची सखोल चौकशी होवुन गावगुंडांवर गुन्हे दाखल करावेत.
सदर प्रकरणी झालेल्या घटनेचा तिव्र निषेध करून शासनाने याची त्वरीत दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर तालुका व शहर च्या वतीने पंढरपूर तहसीलदार सुनील लंगोटे यांना देण्यात आले.
.या वेळी सुनील सर्वगोड राज्य सचिव, जितेंद्र बनसोडे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस, आप्पासाहेब जाधव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, बाळासाहेब कसबे पश्चिम महाराष्ट्र सचिव, कुमार भोसले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,संतोष पवार तालुकाध्यक्ष,ऍड.कीर्तीपाल सर्वगोड शहराध्यक्ष, विजय खरे शहर कार्याध्यक्ष,दयानंद बाबर तालुका सरचिटणीस, सचिन गाडे शहर सरचिटणीस, सचिन भोसले तालुका कार्याध्यक्ष, संदेश माने जि.युवक संघटक,विशाल मांदळे युवक श.अध्यक्ष,निलेश जाधव,भैय्या फडतरे, बत्तास वनसाळे,विशाल कसबे सरपंच, विक्रम चंदनशिवे,पोपट क्षीरसागर,आकाशभैय्या शिंदे, नितीन गायकवाड, समाधान आठवले,रुपेश वाघमारे,महादेव सोनवणे,राघु भोपळे, आण्णा कांबळे, दत्ता वाघमारे,अमर फडतरे
यावेळी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.