परभणी घटनेचा बहुजन समाज पक्षाचे वतीने निषेध
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :१०/१२/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्यासमोरील काचेच्या पेटीत असणारे भारताचे संविधानाच्या प्रतिची मोडतोड काही समाज कंटकाकडून केली गेली. हे कृत्य प्रशासनाच्या ढिसाळपणाचे आहे. त्या गोष्टीचा बहुजन समाज पार्टी पंढरपूर तालुका व शहराच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येऊन प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे मार्फत शासनास निवेदन देण्यात आले.
सदर घटनेची सखोल चौकशी करून अशी कृती करणाऱ्या देशद्रोही समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना ताबडतोब अटक करावी व त्या व्यक्तिच्या पाठीमागून ज्या व्यक्ति व संस्था अशी कृत्ये करण्यास प्रवृत्त करत आहेत त्यांची सखोल चौकशी करुन त्यांनाही जास्तीतजास्त कडक शिक्षा व्हावी व भारतीच्या घटनेचे व महापुरुषाची होणारी विटंबना थांबवावी, अन्यथा बहुजन समाज पार्टीच्यावतीने संविधानात्मक मागनि रस्त्यावर उतरुन तीव्र निर्देशने व आंदोलने करण्यात येतील. त्यावेळेस होणाऱ्या सर्व प्रकारच्या नुकसानीस सरकार व प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा निवेदनात देण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून या घटनेचा छडा लावावा अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर . भालचंद्र यल्लाप्पा कांबळे, सोलापूर जिल्हा प्रभारी, बहूजन समाज पार्टी,पंढरपूर प्रभारी सुरेश शिंदे गौतम साबळे अध्यक्ष पंढरपूर बामसेफ. एल.एस. सोनकांबळे बामसेफ दत्ता रामचंद्र वाडेकर . सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष , तानाजी आगावणे, पंढरपूर प्रभारी कालिदास गवळी,नाना गवळी आदींच्या सह्या आहेत.