फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे वतीने अमित शहा यांचा निषेध
‘
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-दि. १८/१२/२०२४ रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा संसदेमध्ये म्हणाले, ‘मान्यवर ही फॅशन झालीय – अंबेडकर, अंबेडकर, अंबेडकर, अंबेडकर, अंबेडकर म्हणण्या ऐवजी देवाचे नांव घेतले असते तर सात जन्मापर्यत स्वर्ग मिळाला असता’या वक्तव्याचा फुले-शाहू-आंबेडकर – विचारमंच, पंढरपूर ता. पंढरपूर सोलापूर यांचेवतीने- जाहीर निषेध करण्यात येऊन निषेधाचे निवेदन तहसीलदार सुनील लंगोटे यांना आज देण्यात आले. या निवेदनात पुढे म्हटले आहे कीं,अमित शहा तुम्ही ज्या आर. एस. एस. चे संस्कारात वाढलात त्या आर. एस. एस. ने नेहमीच डॉ. बाबासाहेब अबिडकर व भारतीय संविधानास विरोध केलेला आहे आर एस. एस. चा इतिहास जाणणारांना नवीन नाही. संसदेतील तुमची टिपण्णी ही दिर्घकालीन आर. एस एस विचारसरणीचा परिपाक आहे. त्यामुळे भाजप संविधानास विरोध करते.
जोपर्यंत या पृथ्वीवर सूर्य- चंद्र आहे, तो पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा टिकुन राहिल. कारण या देशातील रत्री-पुरुषाला मानवी प्रतिष्ठा, दर्जा (समान दर्जा ] प्राप्त करून दिलेला आहे. भारतीय संविधानाने या- देशातील मनुस्मृतीचा कायदा नष्ट केला असून शक्य- तितक्या लवकर या देशात विविध जातीमध्ये बंधुभाव निर्माण करण्याची जबाबदारी तुमच्या सारख्या लोकप्रतिनिधीची आहे. म्हणजे या भारतभूमीला मानवाशी मानवासारखे वर्तन-व्यवहार करून स्वर्ग बनविणे आवश्यक आहे.
डॉ बाबासाहेबांनी या देशाला संविधान संमत लोकशाही राष्ट्रनिमर्माणाचे कार्यात खूप मोठे योगदान दिले- आहे. म्हणूनच तुम्ही लोकशाही संसदीय प्रणालीमुळे देशाचे गृहमंत्री आहात, डॉ आंबेडकर या देशाची फैशन नसुन भूषण आहे.
प्रत्येक भारतीयांनी डॉ. बाबासाहेब नांव दररोज घेतलेच पाहिजे भारतीय संविधानानुसार वर्तन व्यवहार केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ,विज्ञाननिष्ठ तर्कनिष्ठ, विवेकवादी बनविले आहे.देवाचे नाव घेतलेवर स्वर्गात जागा मिळते ही भाषा वापरून भारतीय संभ्रमित, करण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. ही विचारसरणी कपोकल्पित आहे, तसेच धर्मग्रस्त मानसिकतेतून केलेचे दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्थेनला / विषमतेला नष्ट करून २६ जानेवारी १९५० पासुन समताधिष्ठित समाज बनविण्यासाठी अथक परिश्रम केले आहे, त्यामुळे तुम्ही डॉ. बाबासाहेब आंडकरांचा व्देष- तिरस्कार करू नये.
डॉ. बाबासो, आंबेडकरांनी” एक माणूस-एक-मत एक-मत- एक-किंमत“ अधिकार तमाम भारतीय विविध जाती-धर्मातील स्त्री-पुरुषांना देवून राजकीय समता प्रदान केली आहे. या- देशातीले लोकप्रतिनिधीनी शक्य तितक्या लवकर सामाजिक- व आर्थिक समता या देशाला प्रधान करणे आवश्यक व गरजेचे आहे. तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरां बद्दल तिरस्करणीय व्देश भावनेने केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात- निषेध करतो. या देशातील SC/S.T. / 0.B.Cवे धार्मिक अल्पसंख्यांकाना डॉ. आंबेडकरांनी सन्मान बहाल केला आहे, आपण केलेल्या वक्तव्या बद्दल तमाम भारतीयांची माफी मागावी . व मनाचा मोठे पणा सिद्ध करावा.बाबासाहेब आंबेडकर हॆ “सिम्बॉल ऑफ नॉलेज” आहेत. येणेप्रमाणे निवेदन दिले असे.
या निवेदनावर अध्यक्ष सुनिल वाघमारे,सल्लागार-बा. ना. धांडोरे आर. पी. कांबळे, श्रीकांत कसबे सदस्य -गुरु दोडिया, संतोष सर्वगोड, राजेंद्र पाराध्ये,-किशोर दंदाडे,.. सुखदेव माने दिपक चंदनशिवे प्रदेश संघटन सचिव रिपाई युवक आघाडी, संजय सातपुते,रवी भोसले,निशीकांत राजगीरे आदींच्या सह्या आहेत.