आ.भारत भालके यांनी स्वःतची पर्वा न करता कार्य केले-आ.रोहित पवार
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे 9860685945
पंढरपूर/ कोरोना हा आजार प्रतिकार शक्ती चांगली असणाऱ्या चा बरा होतो परंतु वयस्कर व अन्य आजार असणाऱ्या लोकांना जर झाला तर यात दगावण्याची शक्यता असते हे माहीत असताना ही आ.भारत भालके यांनी मधुमेह, किडणी विकार या आजाराची पर्वा न करता सातत्याने कार्यात सक्रिय राहीले.ते स्वतःसाठी न जगता दुसऱ्यासाठी जगले त्यांच्या अचानक जाण्याने पोटनिवडणूक लागली असुन त्यांचे अधुरे राहिलेले काम पुर्ण करण्यासाठी त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. असे मनोगत कर्जत जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले.ते पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक राष्टवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या कालिका देवी चौक येथील प्रचार सभेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणालेकी,विरोधी पक्षातून उभे असणारे उमेदवार हे फक्त निवडणूक लढविण्यासाठीच येतात व नंतर गायब होतात मतदारांवर नैसर्गिक आपत्ती आले तेव्हा ते कोठे असतात हे त्यांना विचारले पाहीजे.मी आणि भगीरथ भालके पंढरपूर येथज एमआयडीसी आणण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार आहोत.”हि लढाई धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती “अशी असुन लोक भगीरथ भालके यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहातील अशी खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भगीरथ भालके, अँड.राजेश भादुले ,संदीप मांडवे,अँँड.दीपक पवार,युवराज पाटील व महाआघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.