पस्तीस गावच्या पाण्यासाठी बिनकामाचे मंत्री आश्वासन देत फिरु लागले- सौ. शैलाताई गोडसे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर प्रतिनिधी/ पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक साठी सर्व पक्षीय नेतेमंडळी, सत्ताधारी, विरोधक आज मंगळवेढा तालुक्यातील गावंगाव फिरत आहेत. त्यांना या मतदार संघातील उजाड माळावरील जनता आता जाब विचारीत आहे.कुठे पाणी आणले ते गाव सांगा.पस्तीस गावच्या पाण्याचे राजकारण करुन,लोकांची दिशाभूल करुन सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा पस्तीस गावच्या पाण्याची कँसेट लावत आहेत. या योजनेला अद्यापही मंजुरी दिली नाही.आणि हे लोक पाण्यावर बोलत आहे.जसा या मंगळवेढ्यातील पाण्याचा प्रश्न आहे.तसेच पंढरपूर मंगळवेढ्यातील विठ्ठल साखर कारखाना, संत दामाजी साखर.कारखान्याती ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत ऊसबीलाचे प्रश्न आहेत. कामगारांच्या वेतनाचे प्रश्न आहेत. रखडलेली विविध विकासकामांचा प्रश्न आहे.या सर्व समस्यांची सोडवणूक मागील भाजपा सरकारने केली नाही. आता हे भाजपा.नेते आश्वासन देत फिरत आहेत.फक्त निवडणूक पुरता पाण्याचा प्रश्न उचलून धरला जातो. निवडून आल्यानंतर विसरून जातात. अशाचप्रकारे सत्ताधारी शासन देखील वागत आहे.गेली कित्येक वर्षे या मंगळवेढ्यातील जनतेला पाण्याची समस्या भेडसावत आहे. या कडे कोणत्याही राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी लक्ष दिलेले नाही.आज याच जनतेला मत मागत फिरत आहेत. दोन्ही तालुक्यातील साखर कारखाने ची अवस्था दुर्दैवी करुन शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त केले आहे. अशा चेअरमन साठी आज हे नेते मत मागत आहेत.ज्यानी कधीच पस्तीस गावातील लोकांच्या पाण्यासाठी अंदोलन केले नाही. की शासन दरबारी प्रयत्न केले नाही. असे आमदारांचे वारसदार म्हणवून घेणारे आणि भूमीपुत्र म्हणवून घेणारे शेतकऱ्यांची ऊसबील थकीत ठेवून, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचे सदस्तव रद्द करणारे आणि शेतकऱ्यांशी सदस्त्व रद्द केले नाही म्हणून खोटे बोलणारे हे भूमीपुत्र आज मतदारांना मत मागत आहेत. जनतेसाठी एकही कल्याणकारी योजना घेऊन हे लोक.शासन दरबारी अंदोलन केले नाही. अशा लबाड लोकांना या निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय रहाणार नाही.
या दोन्ही तालुक्यातील जनता कामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.हेच या प्रचारदौऱ्यातून या सत्ताधारी आणि विरोधकांना दिसून आले आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे नेते आज या मतदारसंघात आपली उपस्थित लावत आहेत. जनता आता या गोडबोल्या पुढाऱ्यांच्या भूलथापा भूलणार नाही. येत्या १७ तारखेला शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौक,कै.स्वर्गीय प्रल्हाद शिंदे चौक,संत दामाजी चौक, बोराळे चौक या परिसरातील मतदार बंधू भगिनींना सौ.शैलाताई गोडसे यांनी केले.



