प्रस्थापित व्यवस्था बदलण्यासाठी महिलांची भुमिका महत्वाची:-प्रा.सुभाष वायदंडे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगली :– डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांना त्यांच्या हक्कांची कवाडं खुली केल्यामुळेच भारतासारख्या पारंपारिक पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली अन्यथा जगामध्ये ज्या पाश्चात्य संस्कृती मध्ये स्त्रियानी अनेक क्षेत्रांमध्ये जी दैदिप्यमान प्रगती केली ती करण्यासाठी अनेक वर्षे लागली असती म्हणून भारतासारख्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये जी प्रस्थापित व्यवस्था करून ठेवली आहे ती खऱ्या अर्थाने जर बदलायची असेल तर स्त्रियांची भूमिका निर्णायक ठरेल असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले. ते सांगली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती दिनी पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी सौ स्वाती सौंदडे (सांगली) यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार प्रसंगी बोलत होते.
प्रा.वायदंडे पुढे बोलताना म्हणाले पुरोगामी संघर्ष परिषद हे एक सामाजिक चळवळीतील नवे वैचारिक वादळ असून समाजाच्या आर्थिक व वैचारिक प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हा संपर्कप्रमुख अमर शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष सावळा (आण्णा)खुडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ संगीता साठे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे, आटपाडी तालुका अध्यक्ष सागर लांडगे, मिरज तालुका अध्यक्ष पृथ्वीराज आवळे ,अंकुश खुडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी आभार मिरज तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा रतन लोखंडे यांनी मानले.
*सांगली*:- डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांना त्यांच्या हक्कांची कवाडं खुली केल्यामुळेच भारतासारख्या पारंपारिक पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळाली अन्यथा जगामध्ये ज्या पाश्चात्य संस्कृती मध्ये स्त्रियानी अनेक क्षेत्रांमध्ये जी दैदिप्यमान प्रगती केली ती करण्यासाठी अनेक वर्षे लागली असती म्हणून भारतासारख्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये जी प्रस्थापित व्यवस्था करून ठेवली आहे ती खऱ्या अर्थाने जर बदलायची असेल तर स्त्रियांची भूमिका निर्णायक ठरेल असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले. ते सांगली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती दिनी पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी सौ स्वाती सौंदडे (सांगली) यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार प्रसंगी बोलत होते.