दोन्ही सरकारने पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचा विकास केला असता तर असे दारोदार फिरायची वेळ आली नसती -शैलाताई गोडसे
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर(प्रतिनिधी) भाजपा सरकार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडी सरकार या दोन्ही सरकारने पंढरपूर मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील विविध विकास कामे तसेच मंगळवेढा तालुक्यातील 35 गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्या ऐवजी आपली सत्ता असताना या दोन्ही तालुक्यातील लोकांना पाण्यासाठी वन वन फिरायला लावले .आज पंढरपूर मंगळवेढा मतदार संघामध्ये भारत भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागलेली आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रांमधील मंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व अन्य मंत्री, आमदार ,खासदार या लोकांना मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाण्याचा प्रश्न हा आठवू लागलेला आहे .या दोन्ही मतदार संघातील जनता आता हुशार झाली आहे. या दोन्ही सरकारने या दोन्ही तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी ,काम करी, बेरोजगार युवकांना फसवण्याचे काम केलेले आहे.
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल साखर कारखाना या कारखान्यातील शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे अद्यापही या चेअरमन दादाने दिलेले नाही. तसेच कामगारांच्या पगारी देखील दिल्या गेल्या नाहीत. पगार मागितली म्हणून कामगाराला जेलमध्ये टाकणारे हे चेअरमन आज आज याच तालुक्यातील मतदारांना मत मागत फिरत आहेत. या कारखान्यावर कित्तेक कोटीचे कर्ज आहे. कारखाना जरी विकला तरी हे कर्ज फिटणार नाही. अशी परिस्थिती या सत्ताधारी चेअरमनने या कारखान्यावर आणलेली आहे. अशा चेअरमन ला मतदार बंधू कदापि निवडून देणार नाही. याची जाणीव झाल्यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री पालक मंत्री व अन्य मंत्री खासदार आमदार हे या पोट निवडणुकीला या मतदारसंघात येऊन शेतकऱ्यांची तसेच मतदारांची दिशाभूल करीत आहेत. मतदार बंधुनी आता या सत्ताधारी राजकीय नेत्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.
या महा आघाडी सरकार च्या अगोदर भाजपाचे सरकार होते। त्यावेळी पाच वर्षे सत्ता हाती असताना देखील त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही. आणि आज या मतदारसंघांमध्ये हे भाजपाचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या मतदारसंघांमध्ये येऊन पस्तीस गावच्या पाणीप्रश्नावर बोलू लागलेले आहेत. पाच वर्ष भाजपच्या हातात सत्ता असताना त्यांना कधी या मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांची, जनतेची कधी आठवण आली नाही. 35 गावच्या पाण्याची योजना राबविण्यात यावी. असे कधी वाटले नाही. आता हेच लोक या पोटनिवडणुकीमध्ये येऊन मतदारांना परत एकदा आश्वासन देऊ लागले आहेत. अशा फसव्या घोषणेला आश्वासनाला या दोन्ही तालुक्यातील जनतेने फसू नये. राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडी तसेच भाजपा या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांना आज धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. मतदार बंधू-भगिनींनी येत्या 17 तारखेला शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून मला एक वेळ विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्यावी. मी या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. असे मतदार बंधू-भगिनींना आव्हान शैलाताई गोडसे यांनी सलगर खुर्द, व सलगर बुद्रुक, पाटखळ, कचरेवाडी या गावी मतदार बंधू-भगिनींना आवाहन केले.