विवेक वर्धिनीचा माजी विद्यार्थी डॉ.अनिल पिसे बनला आफ्रिकेत शास्त्रज्ञ

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
–श्रीकांत कसबे
पंढरपूर :-विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून दक्षिण आफ्रिका येथे जोहान्सबर्ग या ठिकाणी वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ.अनिल पिसे यांनी हे वरिष्ठ शास्त्रज्ञ बनले आहेत.त्यांनी प्रशालेला भेट दिली त्यावेळी त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, सचिव ॲड.वैभव टोमके,खजिनदार सलीम वडगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्राचार्य राजेंद्र पाराध्ये उपस्थित होते.डॉ.पिसे यांनी सांगितले की आज मी जे काय आहे ते केवळ विवेक वर्धिनी मुळे आहे.माझा पिंडच या प्रशालेने घडवला आहे.अत्यंत हलाकीच्या स्थितीमध्ये संत पेठ सारख्या झोपडपट्टीमध्ये राहत असताना केवळ विवेक वर्धिनी मध्ये मी शिक्षण घेतल्यामुळे मला सातासमुद्रापार भरारी मारता आली.विवेकवर्धिनी मधील कोणत्याही विद्यार्थी वाया जात नाही तर उच्च पदावर विराजमान होतो याची प्रचिती आल्याचेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले या प्रशालेतील सर्व शिक्षक आत्मीयतेने,तळमळीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात संस्थेचीही त्यांना प्रेरणा मिळते म्हणूनच आम्ही यशस्वी होतो असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी ,उत्तरेश्वर मुंढे, मुख्य लिपिक हनुमंत मोरे ,
राजुभाई मुलाणी, शिवाजी येडवे, सुनिल विश्वासे, श्रीकांत चव्हाण,अन्वर सय्यद,हमीद सय्यद व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.