विवेक वर्धिनी मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :-विवेक वर्धिनी विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप व शुभचिंतनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इयत्ता दहावी ड या वर्गामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र पाराध्ये हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा विषयी माहिती दिली व तणावमुक्त व कॉफी मुक्त परीक्षा द्यावी अशा प्रकारची चे संबोधन केले.यावेळी उपमुख्याध्यापक तुकाराम कौलगे, तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, राजन शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख शिवाजी येडवे ,वर्ग शिक्षक राजूभाई मुलाणी,विषय शिक्षक सुनील गुरव,वसंत सातपुते, नामदेव कांबळे, दत्तात्रय निकम,श्रीकांत चव्हाण हे शिक्षक उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी इयत्ता दहावी मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.